पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उधळे युग.

करणारे प्रौढ, व छानछोकींत अपव्यय करणारे तरुण, अशा दोघांकडून पैशाची हानि होत असते. पैसा हें साधन आहे, साध्य नव्हे, ह्या म्हण- ण्याला संमति कोण देणार नाहीं ? पण साधनाचे संरक्षण केलें नाहीं तर साध्य तरी संपादन कसें करतां येईल? चाहेल तेथे शत्रूवर आघात करत यावा म्हणून शस्त्र आपल्याजवळ सतत सज्ज ठेवावयास नको काय ? साधनाच्या विसर्जनानें उद्दिष्ट सिद्धीस कसें जाणार ? म्हणून पैसा न करणें हें अत्यंत श्रेयस्कर होय. अमेरिकेनें सधनतेच्या जोरावर सर्व जगाचें लक्ष आपणाकडे वेधून घेतलें आहे, इतकेंच नव्हे तर सर्व राष्ट्रांच कारस्थान आपल्या लगामी ठेवलें आहे. चालू युग हैं धर्मयुग नव्हे, आर्थिक युग आहे. ह्या युगांत नीतीचें धर्माचें तेज पडणार नाहीं. सर्व कांहीं द्रव्याधीन, सर्व द्रव्यमय आहे. आर्थिक प्रश्नांच्या अनुरोधानें धार्मिक व सामाजिक प्रश्न सोडवावे लागतात, आणि आर्थिक क्रान्तीनें उद्भव - णाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याकरितां सर्व राजकारण खर्ची घालावें लागतें. अशा ह्या युगांत पैशाची उपेक्षा करून कसें चालेल ? “ धर्मादपि व्यव- हारो गरीयान् " हैं चाणक्यसूत्र विसरून आपलें कसें भागेल ? धनवश न होतां धनीपणा स्वीकारण्यांत सर्व नीतीचें बीज असतें.
 पण हल्ली पाहावें तों, अवाच्या सवा खर्च करणें हें श्रीमंतीचे लक्षण मानलें जातें. वस्तुतः चारखुंट जहागीर हातीं लागण्याचाच हा सुलभ मार्ग आहे. खर्च करण्याकरतांच पैसे मिळवावयाचे असतात ह्या अर्धांगी तत्त्वाचेच भक्त सांप्रत सर्व बनले आहेत. आपणांस अवश्य कराव्या लागणाऱ्या खर्चाकरितां आपण पैसे कमावतों. त्याचप्रमाणें प्रसंगानुसार अथवा अनपेक्षित कारणांनी खर्चाची धाड आपणांवर येते, तेव्हां हि आपली तयारी असावी अशा हेतूनेंहि पैसा कमावणें अवश्य आहे. पण ह्या तत्वाची मात्र धरसोड केली जाते. मिळेल तो पैसा खर्च केला म्हणज प्रसंगाला तोंड देण्यांस आपण असमर्थ होतों, आणि मग दुसऱ्या-