पान:गच्चीवरील गप्पा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गप्पा चालत असतं तेव्हां या ठशाच्या कोंदणांत बसतील अशी कोणाची अटकळ नव्हती. त्यावेळी कोणी लघुलेखक नव्हती अथवा वर्तमानपत्रांचे रिपोर्टरहि नव्हते. पण आम्ही गप्पा मारा शिवाय दिवस दो दिवस राहून जाणारे पाहुणे असत, त्यापैकी हावरून हे पांढऱ्यावर काळें करण्यांत आले आहे. ह्यांपैकी वन्याच गप्पा 'लोकमान्य' वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढें तें दैनिक बंद पडल्यावर 'विस्तार', 'मनोरंजन', इत्यादि मासिकांतून अवशिष्ट गप्पा प्रसिद्ध झाल्या. व त्या सर्व आतां एकत्र करून पुस्तकरूपानें पुनः बाहेर पडत आहेत. विषयाची संगति, भाषेची ठाकठिकी, रचनेचे चातुर्य, प्रमाणांची मांडणी हे गुण गप्पांमध्ये आढ- ळणें शशशृंगाइतकेंच अशक्य होय. ' अर्थरि तात्पर्य ' हा न्यायच येथें वाचकांनीं लागू करावा. त्यांत आणखी प्रकाशकाच्या स्वतःच्या प्रमादांची भर पडून साजांत अधिकच उणेपणा राहणार हे उघढ आहे.
 ह्या पुस्तकांत प्रदर्शित झालेली कांहीं मतें परंपरप्रियता दर्शवितात. एकंदरीत हें गप्पामंडळ अर्वाचीन संस्कृतीच्या मूलभूत सिद्धांतांची पूजा करणारें नाहीं हें खास. एकदां करारविषयक स्वातंत्र्य ह्यावर गप्पा चालल्या होत्या. पुष्कळ चर्चा झाली. आणि अखेरीस असें ठरलें कीं अडाणी, अशिक्षित, गरजू, अर्धपोटी, उडाऊ, चैनी, चंगीभंगी, परावलंबी, ह्यांना वाटेल तो करार करण्याची मोकळीक देणें म्हणजे त्यांचा सर्वस्वी घात करणें होय. भारतकालाच्या पूर्वीपासून व्याजाचा दर एक रुपाया दर- महा दरशेकडा रूढीनें कायम झाला होता. आतांहि रूढीची गुलामगिरी नाहींशी झाली खरी, पण स्वातंत्र्याची गुलामगिरी तत्स्थानारूढ झाली, ह्याची वाट काय ? करारस्वातंत्र्यानें धूर्त सावकारांचे मात्र फावलें. वाटेल त्या मुदलाचा, वाटेल त्या व्याजाचा करार करून घेणे मोठेसे अवघड नाहीं. ह्यापायी पुष्कळ लोक भिकेस लागले. पण थोडे लोक धनाढ्य आणि बहुतेक उपासमार काढीत असलेले, हीच फलश्रुति आधुनिक