पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

मुसलमान कुटुंबांत पुनर्विवाह रूढ नाहीं. तसेंच अफगाणिस्थानांत जे हिंदू आहेत त्यांच्यांत हिंदुत्वाचा अंश किती असणार ? मुसलमानांच्या धतीवर त्यांची चालचर्या जाणें स्वाभाविक आहे. पण हल्ली पहावें तों समाजशास्त्राच्या नियमांविरुद्ध तत्वज्ञान उपदेशण्यांत येत आहे. अल्पसंख्याकांचे हक्क, आणि बहुसंख्याकांचं काय तर जबाबदारी, हा उरफाटा न्याय कोणत्या गांवचा ? अल्पसंख्याक समाजासंबंधानें वहु- संख्याक समाजावर जबाबदारी आहे खरी; पण ती नैतिक स्वरूपाची होय. अनेक धर्माचे लोक हिंदुस्थानांत येऊन राहिल्यामुळे त्यांच्या हक्कांचा पुरःस्कार करणें म्हणजे देशांत नेहमी कलाहाग्नि पेटवून ठेव- ण्यासारखे आहे. पण हें भ्रामक, अचरट, तत्वज्ञान समाजांत शिष्टपणानें वावरत आहे. ह्याच्याविरुद्ध तोंड उघडण्याची छाती कोणाची आहे ? विपरीत मतांचा धुमाकूळ सध्यां आमच्याकडे माजला आहे. कोणत्याहि विचाराला स्थैर्य अथवा निर्विकल्पता नाहीं. पूर्वीच्या अनुभवाची लोकांना किंमत वाटत नाहीं. जणूं काय पुसलेली पाटीच आपल्या समोर असून आपण आतां नवीन सृष्टि वनवीत आहों ! आमची संकृति फार प्राचीन आहे म्हणणें पाश्चात्यांना न रुचणें स्वाभाविक आहे. पण आम्हींसुद्धां तीच समजूत उराशी घट्ट धरून चालतों ही मोठ्या नवलाची गोष्ट आहे. आम्ही परंपरेला आजपर्यंत महत्त्व देत आलों त्याचें कारण तींत संग्रहित असलेला हजारों वर्षांचा अनुभव हैं होय. अनुभव म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. त्यापुढें कल्पनेच्या तात्त्विक भराऱ्या कवडीमोल होत. पण नवीन विटी, नवीन दांडू, ह्याचीच हौस. फार शहाणपणाच्या घमेंडीचे हे सर्व चार आहेत. नवीन, स्वतंत्र, विचारांना आळा घालण्याचें पातक कोण करील ? जुन्या विचारांना तुच्छपणानें लाथाडूं नका इतकाच आग्रह प्रतिपक्षाला धरतां येईल.
 ह्याप्रमाणें आमच्या गप्पांच्या झोंताचें स्वरूप होतें. बेजबाबदारपणानें मारलेल्या गप्पांची भाषाहि बेजबादार असणार हे उघड आहे. आमच्या