पान:गच्चीवरील गप्पा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

संस्कृतीची आहे. हैं स्वातंत्र्य लवाडांना फायदेशीर झाले आहे. आणि अखेरीस हैं स्वातंत्र्य छाटण्याचे प्रयत्न करणें भाग पडलें हें आपण पहा- तोंच. राजकीय बाबतींत स्वातंत्र्य देण्यास लायकी लागते. मग बाकीच्या गोष्टींत मात्र पूर्ण मुभा कां असावी ? आणि इतर बाबतींत जर मुभा, तर राजकीय बाबतींत कां नसावी ? असो, एकंदरीत नूतनसंस्कृति जनतेला पूर्वीपेक्षा अधिक सुखी करण्यास समर्थ झाली नाहीं असा ह्या गप्पांचा रोख आहे. आमचा विद्यमान समाज सुबुद्ध अथवा विवेकी नाहीं असें वैवाहिक व और्ध्वदेहिक कर्मांची छाननी करतांना आढळून आले. तसेंच तो नीतिदृष्ट्या सडका झाला आहे असें व्यवहाराकडे न्याहाळून पाहिलें तर अनुमान करावें लागतें. वैयक्तिक शुद्धाचरणावरून नीतिमत्तेचें सर्टि- फिकट हल्ली कोणाला मिळणार नाहीं. ते दिवस गेले. सार्वजनिक कृत्यांत जो नीतिमार्गाने चालतो तोच नीतिमान. एकादा मनुष्य दारु पति असेल अथवा क्वचित् वेश्यागमन करीत असेल, पण तो जर सार्वजनिक कार्यांत अथवा दुसऱ्याशी संबंध आला असतां निस्पृहपणानें वागेल तर त्याच्या योग्यतेंत फारसा कमीपणा येणार नाहीं. उलट, वैय्यक्तिक नीतिमर्त्तेत भरपूर गुण मिळत असूनहि कुलाला फसविणारा, अनाथ अबलांचे केसानें गळे कापणारा, धाकट्या भावांशी प्रतारणा करणारा, सार्वजनिक फंड गिळं- कृत करणारा, असा असेल तर त्याला कोणीहि नीतिमान म्हणणार नाहीं. दुसऱ्याशी संबंध आला असतां आपण कसे वागतों इकडे इतः- पर लोकांचें लक्ष्य लागेल. एकांडी माणसाच्या वागणुकीची चौकशी कर- ण्यास कोणाला वेळ आहे ? व करून उपयोग तरी काय ? म्हणून नीतीच्या कल्पना ह्या पुढे साफ बदलणार. मिनिस्टर झाल्यावर तो आपल्या पगा- रादाखल मिळणाऱ्या पैशाच्या थैलीकडे पाहतो किंवा जनहिताकडे पाहतो ह्याचा विचार करून लोक नीतिमत्ता ठरवितील. पुढारी म्हणविणारे लोक आपला बडेजाव राखण्याकरतां देशभर भटकतात अगर देशाच्या
१०