पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाटपांच्या दाव्यांकरतां स्वतंत्र कोर्टें पाहिजेत

विद्यमान युगांतील विशिष्ट परिस्थितीमुळे समाइक कुटुंबपद्धति जरी नामशेष झाली तरी तदंगभूत फायद्यांना आपण मुकणें अनर्थवह होणार आहे. ह्या पद्धतीतील दोष काढून गुणांचेच जर संरक्षण केलें तर त्या- पासून वैय्यक्तिक तसेच सामुदायिकहि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीं. समाइक कुटुंबांत एकच " कर्ता " पुरुष असतो व त्याच्यावरच सर्व कायदेशीर जवाबदारी असते. त्यामुळे वाकीच्या व्यक्ति अनुद्यमशील व उदासीन बनतात हा ह्या पद्धतीचा मोठा अवगुण आहे. एकानें कष्ट करावे आणि बाकीच्यांनी त्याचा फायदा घ्यावा हा प्रकार अश्लाघ्य होय. एकंदरीत ही पद्धति म्हणजे आयत्या बिळांत घुसणाऱ्या नागोबांची वाढ करणारी सुपीक भूमि होय. वडिलार्जित मिळकतीत आपल्या श्रमानें जे भर घालूं `शकत नाहींत त्यांना वस्तुतः कोणत्याहि वाढधनांत हिस्सा मिळणें युक्त नाहीं. - वडिलार्जित मिळकत असेल तेवढ्यांतच त्यांना भाग मिळणें वाजवी आहे व तशा प्रकारचे स्मृतिवचनहि आहे. "यत्किंचित् पितरि प्रेते धनं ज्येष्ठोऽधि- गच्छति । भागो यवयिसां तत्र यदि विद्यानुपालितः ॥” (मनु). परंतु पैसे मिळवण्याची ज्यांच्यांत अक्कल नाहीं त्यांना ह्या वाढाव्याचा लोभ घर- ण्याचे कारण नाहीं, हा सिद्धांत जरी न्यायाचा असला तरी प्रत्येकाची अर्जनशक्ति बरोबर मापर्णे प्रायः अशक्यच आहे. आणि म्हणून वर उल्लेखलेला दोष टाळतां येणें शक्य नाहीं. तेव्हां समाइक कुटुंब नाहीसे करून भागीदारी पद्धतीवर कुटुंबाची स्थापना झाली पाहिजे. मिताक्षरी हिंदु समाजांतील कुटुंबे ह्या पद्धतीमुळे वसत चालली आहेत हें महाराष्ट्री- -यांस तरी अननुभूत नाहीं. रिकामटेकडे भाऊ व चालढकलीचीं, चेंगट,

७३