पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

असून शेतक-यांना कर्जाऊ पैशाचा पुरवठा त्यांच्याकडून होत असे. शह- रांतील बँकांचे कार्य ह्या कुटुंबपेढ्या करीत असत. पण एकत्र कुटुंबांत विच्छेद झाल्यामुळें पुरेसें शिलकी भांडवल कोणाजवळच राहत नाहीं म्हणून पसरलेलें व निरुपयोगी म्हणून पडून राहिलेले भांडवल संकलित करून तें कार्यक्षम करण्याकरतां बँका अस्तित्वांत आल्या व ह्या जगड्- व्याळ भांडवलावर प्रचंड कारखाने उभारणें शक्य झालें. ह्या राक्षसी कारखान्यांनी लहानसान धंदे ठार बसवलें. सारांश, समाइक कुटुंब जाऊन व्यक्तिमूलक कुटुंब बनल्यानें ही विस्मयकारक क्रांति घडून आली. आतां कोणी कितीहि शोक केला तरी समाइक कुटुंबाचे दिवस भरले खास.





७२