पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकत्र कुटुंबाचे दिवस भरले.

 हल्लींच्या दिवसांत एकत्र कुटुंब टिकणें अशक्य झालें आहे. प्रत्येकांचें अर्जनसामर्थ्य निराळें. एक भाऊ आय. सी. एस. असेल तर दुसरा कचे- रींत कारकून असेल; एक भिक्षूक असेल तर दुसरा दिवाण असेल. तसेंच शिक्षणाच्या योगानें प्रत्येकांची मतें निराळीं ; आवडनावड, अभिरुचि, ह्यांतहि विलक्षणता. ह्या खेरीज एकत्रवासाचा असंभव, इत्यादि कारणें समाइक कुटुंबाचा अंत करण्यास पुरेशी आहेत. तथापि बापाच्या पश्चात् आई दिवंगत होईपर्यंत कांहीं भाऊ एकत्र राहतात. पण सुखाने नांद- णारी कुटुंबे क्वचित्. घरांत नेहमीं कुजबुज, धुसफूस असावयाचीच; एकाचें तोंड पूर्वेस तर दुसऱ्याचें पश्चिमेस; वेदाद कारभार; अशी स्थिति कांहीं अपवादात्मक नसते. तशांत कुटुंबाच्या स्वास्थ्याची होळी करणारी ' आगजाळी बायको आणि ऋणायस्वरूपी पुरुष ह्यांची दुकल जुळली म्हणजे कांहीं पुसू नका. घरांत सदा कटकट; एवढ्याशा तेवढ्याशा - चरून भांडणें, नांवाचें एकत्र कुटुंब, पण सर्वच यजमान. पण हैं यज- मानत्व म्हणजे चाहेल तो खर्च करण्यापुरतेंच असतें. जबाबदारीला यज- मान एकच. अशा स्थितीत एकत्र राहण्यांत कांहीं मौज नाहीं; पण राहणें भाग पडतें, त्याला अनेक कारणे असतात. उत्सुकतेनें कोणीच राहात नाहीं. सध्यां ब्राह्मणांची स्थिति तर फारच हलाखीची झाली आहे. महर्घते- मुळे वेगळें राहणें कांहीं दिवसांनी परवडणार नाहीं, निराळें राहण्यानें खर्च फार वाढतो. कुटुंबाचा समाइकपणा मोडत चालला खरा; पण चम- कार हा कीं, वाकींच्या बहुतेक व्यवहारांत समाइक तत्त्वाचा प्रसार होत आहे.
 अर्थतः विभक्त राहून एकवट राहणें मात्र जुळण्यासारखे आहे. एकत्र कुटुंबाचे फायदे मिळावेत पण त्यापासून उद्भवणाऱ्या अडचणी नसाव्या अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी उपरिनिर्दिष्ट पद्धतीचा अंगी - कार करावा. कायद्यानें तरी बापाच्या मरणानंतर मुलगे आपोआप विभक्त

६९