पान:गच्चीवरील गप्पा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गच्चीवरील गप्पा.

झाले असें कां मानूं नये ? बंगालमधील पद्धतीच हल्लीं सर्वमान्य होण्या- सारखीच आहे. पण परकी न्यायाधीशांना हिंदुधर्मशास्त्राचें रहस्य सम- जेल तेव्हां ना ? बाप मरतांक्षणींच मुलांमध्यें Tenancy-in-Com mon समजली जावी. आतां, कोर्ट कांहीं करो, कांहीं मानो, पण आप- णांस आपल्या मताप्रमाणे वागण्यास तर कोणाला बंदी करतां येत नाहींना ? एकत्र राहणें अशक्य हें जाणून बापानेंच वस्तुतः आपण होऊन मुलांच्या वांटण्या करण्यास कांहींएक प्रत्यवाय नाहीं. असें केलें असतां किती तरी कलह मुळांतच नाहींसे होतील. चांदण्या न करतां मरणें म्हणजे मुलांच्या संबंधानें जें आपले कर्तव्य तें आपण बजावलें नाहीं अशी समजूत आतां झाली पाहिजे. रहाटाच्या गाडग्याप्रमाणें कर्त- व्याकर्तव्यविचार बदलत असतो. आज जे कर्तव्य आहे तें उद्यां अक- र्तव्य होईल. एकत्र राहण्यांत पूर्वी लोकांना मोठेपणा वाटत असे. ती एक लौकिकाची बाब होती. एकत्र राहण्यानें स्वभावाचें मार्दव, लोभाचें नियंत्रण, अनीतीचा संकोच इत्यादि गुणांचा परिपोष होत असे. नुसत्या पैशाच्या दृष्टीनें विचार केला तरी एकत्र राहणीनें बचत पुष्कळ होते ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाय नोकराचाकरांची वाण भासत नाहीं; असहाय स्थिति जाणवत नाहीं; कोणतीहि जोखीम शिरावर घेण्यास माणूस सुटा असतो. असें एक ना दोन अनेक गुण ह्या पद्धतीत आहेत. देशाचाहि त्यामुळे फायदाच होत असे. नवराबायको व लहान अर्भकेंह्यांचेंच सध्यां कुटुंब बनत असल्यामुळे,सूतिकागृहें काढावी लागली. कारण बायकोच्या बाळंतपणांत दुसरें मनुष्य कोण उपयोगी पडतें ? बायको आजारी पडली तर तिची चाकरी करण्यास कोण असणार ? तेव्हां रुग्णालयें सर्वत्र उघडावीं लागलीं. घरांत करावयास कोणी नस- ल्यामुळें आयते तयार पदार्थ बाजारांतून आणणे भाग पडतें. तेव्हां त पदार्थांचा व्यापार सुरू झाला. तिसरें मनुष्य कुटुंबांत नसल्याकारणानें

७०