पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उद्घाटन.

मस्तकावर जाऊन कां बसत नाहीं. ? एकाद्या मुसलमानानें गुजरी उष्णीष मस्तकावर धारण कां करूं नये ? सुधारलेल्या विद्वान मुसलमानानें प्रेत 'पुरण्याऐवजीं जाळलें असें कधीं घडलें आहे काय ? पुरुषांनी बाय- कांची लुगडी अथवा झगे ह्यांनीं आपणांस लपेटून घेतलें तर ? पण नाहीं. तात्पर्य, मनुष्य बह्वंशी परतंत्रच आहे. पारतंत्र्याच्या वर्तुळांत राहून त्याला स्वातंत्र्य मिळेल तेवढेच. असें असून स्त्रीजातीच्या परावलंबित्वा- बद्दल सध्यां नाथु ढाळले जात आहेत. व स्त्रीपुरुषांचा समान दर्जा शिष्टसंमत होऊं लागला आहे. ह्या व दुसऱ्या अनेक कारणांनीं समा- जांत सारखी खळबळ उडून राहिली आहे. लहान समाज मोठ्या समाजांत विलीन झाला पाहिजे हा निसर्गनियम आहे. दोन भिन्न संस्कृतीचे समाज शेजारी सलोख्यानें, सुखानें, नांदा- वयास पाहिजे असतील तर लहान समाजाने मोठ्या समाजाशी एक- रूप शक्य तेथपर्यंत झाल्याविना गत्यंतर नाहीं. आजपर्यंत लहान समाज असेंच करीत आले. लिंगायत, जैन वगैरे समाज हिंदूंत बहुतेक मिसळून गेले होते. अष्टागरांतील ज्यू लोक पाहाना. ते हिंदु नाहींत हें सांगितल्याशिवाय समजणार नाहीं. भाषा, पोषाख, आचार ह्यांनी ते हळूहळू हिंदुच बनले. मुसलमानांसंबंधी सुद्धां कांहीं निराळा प्रकार नव्हता. मुसलमानांचें स्वराज्य साम्राज्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वकीयत्वाचे प्रमाण अधिक राहिलें हें खरें पण तें पोषाखापुरतेंच होतें, भाषा, आचार, कायदा हैं सर्व शेजारच्या हिंदूंचें. दक्षिण हिंदुस्थानांत तरी ही स्थिति आजपर्यंत होती. ह्या वृत्तीमुळे निरनिराळे समाज आनं- दानें नांदले. हिंदूंच्या चालीरीति स्वीकारण्याबद्दल हिंद्वितरांवर कोणी जुलुमजबरदस्ती केली नाहीं. ही स्थित्यंतरें निसर्गनियमाला अनुसरून होत होतीं. पुष्कळ मुसलमान पूर्वी हिंदूच होते, म्हणून हिंदूंच्या कित्येक विशिष्ट चाली त्यांनीं अद्यापि सोडल्या नाहींत. उदाहरणार्थ, कित्येक