पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेतापुढे विस्तवाचें मडकें कशासाठी ?

 दहनविधि हा एक संस्कार आहे, ही गोष्ट सतत ध्यानांत ठेवावी म्हणून तेंहि कृत्य आनंदानेंच केलें पाहिजे असा शास्त्राचा कटाक्ष आहे. “ अतो न रोदितव्यं हि क्रियाः कार्याः प्रयत्नतः " असें कात्यायनाचें वचन आहे. ऋआंत्रसुद्धां हेंच सांगतो. 'प्राचो अगाम नृतये हसाय द्राघीय आयुः प्रतरं दधाना ' - आपण नाचण्याहंसण्यासाठीं आतां घरीं जाऊँ या, असा मंत्र म्हणून सर्व मंडळीनें स्मशानांतून पाऊल काढा- वयाचें असतें. असें असतां भाडोत्री ऊर वडवून घेण्याची पद्धति आम- च्यापैकी कित्येक जातीत कशी घुसली ?
 सर्वे क्षतान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः । संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥ हें खरें नाहीं काय ?






६७