पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गच्चीवरील गप्पा.

कधींहि करूं नये; थोडें तरी वस्त्र अंगावर ठेवावें, असा आचार ह्या स्मृतिकाराला संमत आहे. प्रेताच्या शरीरावर चिंधीच असावी हें सांग- ण्याचा उद्देश नाहीं. नमस्थितींत दहन करूं नये हें सांगण्याचा मुख्य हेतु; म्हणून थोडें तरी वस्त्र असावें असें विधान करावें लागलें. पण आमच्या अज्ञानामुळे आम्ही भलताच अर्थ करून विपरीत आचार सुरू केला. म्हणून अंगावरील वस्त्रे काढणें मूर्खपणाचें आहे.
 आमच्यामधील दहनाची चाल सर्व जगाला अनुकरण करण्यासारखी आहे. ही चाल फार पुरातन आहे ही गोष्ट ऋग्वेदमंत्रावरून चांगली प्रत्ययास येते. कांहीं लोक-प्रायः अनार्य - वेदकाली सुद्धा प्रेतें पुरति, नुसती टाकून देत अथवा गिधाडांकडून खाववीत. ह्या सर्व रूढींचा उल्लेख खालील आथर्वण मंत्रांत केलेला आढळतो. 'ये निखाता ये परोप्ता ये दग्धा ये चोद्धिताः सर्वांस्तानम आवह पितृन् हविषे अत्तवे (१९-२-३४)ः जे जमीनीत पुरले गेले; ज्यांना दूर टाकून दिलें ( परोप्ताः दूरदेशे कष्टवत् परित्यक्ताः- सायण ), ज्यांना जाळले; ज्यांना उंच जाग्यावर ठेवलें (उद्धिताः ), त्या सर्व पितरांना हे अग्ने, हविरन्न भक्षण करण्या- करतां घेऊन ये.
 इहलोकीं केलेलें दान परलोकीं मृताला उपयोगी पडतें ही कल्पना वैदिक काळाइतकी जुनी आहे. ह्या कल्पनेचा विस्तार होऊन दानांत उत्त- रोत्तर भर पडत गेली.
 एतत् ते देवः सविता वासो ददाति भर्तवे । तत् त्वं यमस्य राज्ये वसानस्तार्यं चर ॥ ( अ. १८-४-३१ ).
 है प्रेत, सर्वांचा प्रेरक जो देव तो तुला हें वस्त्र देत आहे तें सुख- कारक वस्त्र परिधान करून तूं यमाच्या राज्यांत भ्रमण कर.
 ह्यावरून दानांची कल्पना मागाहून ब्राह्मणांनी काढली असें मानण्यास जागा नाहीं. संपत्तीबरोबर दानांचीहि वाढ होणें खाभाविक होतें.

६६