पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेतापुढे विस्तवाचें मडकें कशासाठी ?

आमच्या हातून होत असतात. तेव्हां ही मडकें धरण्याची अर्थशून्य चाल ताबडतोब बंद होईल तर बरें.
 सूत्रांत क्षौराचें विधान नाहीं असें असून सध्यां शक्य तितकें विकच होण्याची रूढि आमच्यांत घुसली ह्याचें आश्चर्य वाटतें. पुढल्या धर्मशास्त्र- कारांनी सुद्धां आमूलाग्र क्षौर सांगितलें नाहीं.
 “ प्रयोगे तीर्थयात्रायां पितृमातृवियोगतः । कचानां वपनं कुर्याद्यथा न विकचो भवेत् " ॥
ह्यावरून असे सिद्ध होतें कीं, क्षौर हें कृताकृत म्हणजे वैकल्पिक आहे. कारण तें सूत्रांत नाहीं. आणि कांहीं स्मृतिकारांनी (उ. लघु आश्वला- यन ) जरी वपन सांगितलें असले तरी मिशा काढण्याचें मुळीच कारण नाहीं. क्षौर आणि वपन वस्तुतः एकच. " क्षरस्य कर्म इदं क्षौरं " म्हणजे वस्तऱ्यानें करावयाचें कृत्य त्याचें नांव क्षौर. आपस्तंवधर्मसूत्रां विवाहितांनीं क्षौर करूंच नये असे एक मत ग्रथित केलें आहे. “ न समावृत्ता वपेरन्नित्येके " ( १-३-१० ). एवढेच नव्हे तर तरुणांनी, ज्यांचे आईबाप आहेत त्यांनीं, मुंडन (हजामत ) नेहमीं करूं नये असेंच शास्त्रवचन आहे. त्यांनीं केस कापावे. ( प्राग्वयस्कैः सपितृकैर्न कार्यं सुण्डनं सदा। मुंडनस्य निषेधेऽपि कर्तनं तु विधीयते ). लहान मुलांच्या डोक्या- वरील केस जरा वाढले म्हणजे क्षौर करून घेण्याची घाई आजच्या मूर्ख बायका करीत असतात ह्याचा विचार केला म्हणजे आमच्या धर्माच्या कल्पना किती बायकी झाल्या आहेत तें पाहून वाईट वाटतें.
 अशाच जातीच्या मूर्ख कल्पनांचे आणखी एक उदाहरण देण्यासारखें आहे. प्राणोत्क्रमण झाल्यानंतर प्रेत घराबाहेर काढण्याच्या पूर्वी नेसू अस- लेलें धोतर सोडून पुरुषाला मुद्दाम लंगोटी नेसवतात. हा धर्माज्ञेचा विप- यस आहे. 'ईषतं प्रेतं शिखासूत्रसमन्वितम् || दहेन्मन्त्रविधानेन नैव ननं कदाचन ॥' (लघु आश्वलायन २० - ४ ) : नग्नावस्थेत प्रेताचें दहन

६५