पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

ठेवली म्हणजे किती तरी लोकांचा त्रास व वेळ वाचेल वरें ? आणि शिवाय स्मशानयात्रेचें विक्राळ स्वरूप नाहींसें होईल तें निराळेच. " इदं पूर्वमपरं नियानं येना ते पूर्वे पितरः परेताः । पुरोगवा ये अभिशाचो अस्य ते त्वा वहन्ति सुकृतामु लोकम् ॥ " असा वैदिक मंत्र आहे. त्याचा अर्थ ः ही पुढे असलेली गाडी पूर्वीपासूनचीच आहे. ह्याच गाडीनें तुझें मृत पूर्वज गेले. ह्या गाडीच्या पुढल्या भागीं जुंपलेले आणि गाडीबरोबर येणारे बैल पुण्यवानांच्या लोकाप्रत तुला नेतात ( नेवोत ). गाडीवर प्रे घालून नेण्यांत कमीपणा आहे ही सद्यःकालीन समजूत चुकीची दिसते. आश्वलायन गृह्यसूत्रावरूनहि प्रेत गाडीवर घालून स्मशानांत नेण्याची वहि- वाट दिसून येते. शवाचें तोंड उघडें ठेवण्याची चाल आमच्यांत कां पडली समजत नाहीं. “ शिरःप्रभृत्यङ्गुलपयर्त पादतलवर्षं प्रेत माच्छाद्य " असें प्रयोगकार सांगतात. म्हणजे प्रेत डोक्यापासून पायांपर्यंत वस्त्राच्छादित असले पाहिजे. स्वच्छ पांढऱ्या वस्त्रानें आच्छादून लोखंडी तिरडीवर प्रेत चढवावें व पारशाप्रमाणें पांढऱ्या सुताच्या बंदांनी तिरडीला जखडून टाकावें. सुंभानें हल्ली बांधतात त्याने प्रेतवहनकर्माचे गांभीर्य कमी होते; व प्रेत विद्रूप दिसतें. अशा रीतीनें जिच्यावर प्रेत ठेवलें आहे अशी ती तिरडी गाडीवर ठेवून गाडी स्मशानाकडे न्यावी.
 तसेच मडक्यांत जळलेली गोवरी घालून हातांत मडकें धरून दाह- कानें पुढें चालण्याची पद्धति असमंजसपणाची नाहीं काय ? श्रौतानि ज्यावेळी लोक वाळगीत त्यावेळीं ही चाल अन्वर्थक होती. पण सध्या श्रौतस्मार्तानच्या अभावी लौकिकानीनेंच दहन करण्याचा प्रसंग आल्या- वर घाणेरडें मडकें हातांत धरण्याचें प्रयोजन काय ? आपल्या गृह्यान आपली दहनक्रिया व्हावी हा मूळचा उद्देश कांहीं वावगा नव्हता. पण आतां त्याचें काय ? आपण मडकें कां धरतों ह्याचा किती ' सुशिक्षित विचार करतात ? धर्मशिक्षणाची फारकत झाल्यामुळे असले वेडेचार

६४