पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रेतापुढें विस्तवाचें मडकें कशासाठीं ?

विवाहविधि व समाजांतील स्त्रीचें स्थान ह्यांची चर्चा करण्यांत आमचे पुष्कळ दिवस गेले तरी सुद्धां ही चर्चा संपण्याचे चिन्ह दिसेना. पण एक दिवस चहाकरतां गचीवर जाण्याची व रस्त्यावरून प्रेत जाण्याची एकच वेळ आली. वेड्या वांकड्या बांबूंची ती तिरडी, प्रेताचें उघडें ठेवलेले तोंड आणि पुढें मडक्यांत विस्तव घालून त्या मडक्याची शिंकाळी हातांत घरून तिरडीपुढे चालणारा व्योष्टलोम माणूस, असा देखावा पाहून आमच्या गप्पा विवाहसंस्कारांवरून अचानक रीतीनें उडाल्या त्यांची झडप आतां अंत्यविधीवर येऊन पडली.
 वेणूंची वक्रता व घट्ट आवळल्यामुळे पडलेले सुंभाचे करकोचे ह्यांनी प्रेताच्या स्वतः सिद्ध भयानकतेंत अधिकच भर पडली. हा सर्व प्रकार पाहून आमच्या लोकांची विचारशक्ति सातां समुद्रांपलीकडे गेली असें वाहूं लागलें. प्रेतवहनाकरता लोखंडाची अथवा पितळेची कायमची केलेली तिरडी लोकांनीं कां वापरू नये याचा आम्हांस उलगडा होईना. पारशांमध्ये अशीच तिरडी वापरतात. हिंदूंनाहि तसेंच करतां कां येऊ नये ? ख्रिस्ती, जपानी व चिनी लोक पेटींत प्रेत घालून स्मशानांत नेतात. बाकीचे लोक बहुधा तिरडीच वापरतात. पण आमच्या तिरडी- सारखी भेसूर, अमंगल तिरडी कोणाचीच नसते. मुसलमान हि ह्या बाबतीत आमच्यापेक्षां वरे. प्रत्येकाने आपल्या घरी लोखंडी तिरडी कायमचीच करून ठेवणे फार सोयीचे होईल. वेदकालीं प्रेतवाहनार्थ गाडीचा उपयोग करीत, ह्या गतरूढीचाहि उद्धार करणे वावगे होणार नाही. प्रेतबहन- कर्माला योग्य अशी एक गाडी मुद्दाम बांधून सर्व गांवच्या उपयोगा करतां

६३