पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

पण दोघेहि जगद्विख्यात झालें नाहींत काय ? परीक्षांना आमच्याइकडे फाजील किंमत देण्यांत येते.
 असो. स्त्रियांनी कितीहि आक्रोश केला तरी स्त्री-पुरुषांचा जो परस्पर- संबंध त्याचा विपर्यास करणे त्यांच्या आटोक्याच्या बाहेर आहे. वळ- चणीचें पाणी आढ्याला कसें जाणार ? कांहीं काल समाजांत खळबळ उडून कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं अशी स्थिति होईल. पण ही स्थिति कायम राहणें निसर्गाच्या विरुद्ध आहे. केव्हांहि झालें तरी स्त्रिया त्यांच्या विद्वत्तेपेक्षां सौंदर्यामुळेंच प्रसिद्ध राहतील. पुरुषसंस- र्गामुळें कोणतेंहि कृत्य स्वतंत्रपणे सतत करणें त्यांच्या हातून होणार नाहीं. व्यवहार एकदां आरंभला म्हणजे त्यांत खळ पडतां कामा नये. नाहीं तर कोणताहि व्यवहार यशस्वी होणार नाहीं. व्यवहारामध्ये सदैव दक्षता आणि अनुचिंतन अपरिहार्य आहेत. पण निसर्गपन्नसत्वा स्त्रीच्या हातून हैं कसें घडणार ? म्हणून क्षणैक चमकून अदृश्य होणाया तात्यांप्रमाणे स्त्रियांच्या सर्व चळवळी होतील. नभोमंडलावर आज स्त्रिया चमकल्या तर उद्यां त्यांचा अस्त होईल. निसर्गापुढे त्यांचें कांहीं चाल- णार नाहीं. तेव्हां त्या पुरुषतंत्र तर राहणारच, पण पतितंत्र राहतील काय हाच प्रश्न आहे. सन १९४५ मधील स्त्री पुरुषावर वरचष्मा करण्याच्या भानगडीत न पडतां उपयुक्त शिक्षणाच्या योगानें अर्थतः गृहस्वामिनी होईल अशी अपेक्षा करणें अनुचित होईल काय ? " स्त्रियो भ्रष्ट नष्टा- 'अहह कलिकालः प्रभवति " असे म्हणण्याचा प्रसंग येऊ नये.



६२