पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सन १९४५ ची स्त्री.

पडते ह्यांत संशय नाहीं. परंतु हॅ सुख म्हणजे शरीरसुख होय. तेव्हां बौद्धिक उन्नतीनें शारीरिक उन्नति होते. आणि शारीरिक उन्नतीनें नैतिक उन्नति होते. अर्थात् वौद्धिक उन्नति हैं साधनांचें साधन आहे. अशा ह्या दुय्यम प्रतीच्या साधनालाच सर्वस्व कल्पून स्त्रिया मोहित झाल्यामुळें त्या समाजघटना विघटित करीत आहेत. शिवाय पोट भरण्याची जवाब- दारी पुरुषांनी आपल्या शिरावर घेतल्यानंतर त्याच कामाकरतां स्त्रियांनी पुढें येण्याचें कारण काय ? वरें, पुरुषांकडून काढून आपण ही जबाबदारी सर्वतोपरी पतकरणें हैं स्त्रियांना शक्य तरी आहे काय ? पुरुषी धंदे कर- ण्याची हौस असणाऱ्या स्त्रियांनी स्वतंत्र वसाहत करून ह्याचा प्रयोग करून पाहावा. पुरुषांवर घर सोंपवून स्त्रियांनी बाहेरील पोट भरण्याचे धंदे करावे. असा समाज किती काळ टिकेल ह्याची कल्पनाहि करतां येणार नाहीं. वरें स्त्रीपुरुषांनी मिळून पोटभरू धंदे करावे असें म्हटलें तर पुरुषांची टंचाई नसतांना स्त्रिया अशा धंद्यांत सामील झाल्यामुळे पुरुष रिकामे बसतील त्याची वाट काय ? निकाम्या स्त्रीकडून प्रजोत्पाद- नाचें तरी काम होतें; निकाम्या पुरुषाचा काय उपयोग होणार ? सारांश कोणत्याहि दृष्टीनें विचार केला तरी स्त्रियांनी पुरुषी उद्योग केल्यानें जगाचा तादृश फायदा होणार नाहीं. पुरुषी धंदे नकोत म्हणून पुरुषी धंद्याचे शिक्षणहि नको. मग 'डिग्री'च्या कच्छपीं तरी आमच्या मुलींनीं काय म्हणून लागावें ? परीक्षेचा शिक्का मारून घेण्याची एवढी अहम- हमिका कशाकरतां पाहिजे ? नोकरी मिळण्याकरतां परीक्षेची किंमत, पण ज्यांना नोकरी नको त्यांना परीक्षा कशासाठी ? परीक्षा देण्यांत कांहीं पाप आहे असें नाहीं. पण परीक्षेचा जाच होतो. पास होण्याच्या नादी लागलें म्हणजे घोकंपट्टी करावी लागते. आणि घोकंपट्टी करीत वसलें म्हणजे खऱ्या विद्यार्जनात व्यत्यय येतो. डॉ. जॉनसन विश्वविद्यालयाचा पदवीधर नव्हता. डॉ. रवींद्रनाथ टागोर यांच्याहि नांवापुढें अक्षरें नाहींत.

६१