पान:गच्चीवरील गप्पा.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सन १९४५ ची स्त्री.

नैतिक उन्नति हें मनुष्याचे ध्येय. देहपुष्टता ही या ध्येयाला साधनी- भूत होते. निरोगी व सशक्त शरीर असेल तर मानसिक स्वास्थ्य मिळतें. आणि तद्वारा मनाची उन्नति करून घेतां येते. ज्यांची देहयष्टि सुदृढ असते ते लोक मनाने मोठे असतात. रोगट, दुर्बल व लुसकान माणसें बहुधा कुत्सित, कपटी, कावेवाज, लफंगी अशीं असतात. शारीरिक ओजानें, सिध्या रस्त्यानें, जें त्यांना करतां येत नाहीं तें युक्तिवाजपणानें, लपंडाव खेळून, त्यांना करावें लागतें. सैन्यांतील जातिवंत शिपाई कसा वागतो हें लक्षांत घ्यावें म्हणजे वरील विधानाची सत्यता प्रत्ययास येईल. स्त्रीपुरुषांच्या स्वभावांमध्यें जो भेद दिसतो त्याचे कारणह स्त्रियांचा स्वाभाविक कमकुवतपणा हेंच होय. पुरुषसुद्धां तारुण्याची तडफ असते तेव्हां उदारधी असतात. पण वयाच्या उतराईंत हिक- मती बनतात. तात्पर्य, दैहिकप्रकर्ष हा मानसिक उन्नतीला साहाय्यप्रद आहे. पण हा प्रकर्ष आपोआप होत नाहीं. नुसतें शरीरसंरक्षणहि अन्ना- वांचून होत नाहीं; आणि अन्न तर श्रम केल्याविना प्राप्त होत नाहीं. अन्न- प्राप्तीला शारीरिक श्रमापेक्षांहि बौद्धिक श्रमाची अपेक्षा जास्त असते. आणि बौद्धिक श्रम करण्याची पात्रता येण्याकरतां आपण विश्वविद्या- लयाचें शिक्षण घेण्याची धडपड करीत असत. आपणांस जगतां यावें, सुखानें जगतां यावें, एवढ्यासाठी हा सर्व खटाटोप मनुष्य प्राणी करीत असतो. पाश्चात्यांनीं आपली प्रगति - बौद्धिक प्रगति करून घेतली. पण ती कशाकरतां ? बौद्धिक शर्यतीत मागे राहिलेल्यांना अंकित करून त्यांना स्वतः सुखाने जगतां आलें. बौद्धिक प्रगतीनें मानवी सुखांत भर

६०