पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्थिक स्पर्धा.

तून जोराने जात असेल तर त्याचें पर्यवसान कशांत होणार हैं न सांग - तांहि समजण्यासारखें आहे. प्रथम शरीरसंरक्षण आणि नंतर शररिसंव- न. हौदांत एका तोटीनें पाणी घ्यावें, पण पाणी घालवण्याकरतां दोन तोट्या लावल्या तर हौद भरेल कसा ? तसाच हा प्रकार आहे. व्यायाम घेणारे, दिसण्यांत सशक्त असणारे तरुण हल्लीं अकाली मरणांगणावर जातात ह्याच्या कारणांचा सूक्ष्म विचार करतां आयापेक्षां व्यय अधिक होतो अशीच खात्री होईल. 'विषय हे इंद्रियांचें तेज हरण करतात' ( इंन्द्रियाणां जरयन्ति तेजः ) हें उपनिषद्वाक्य अर्थपूर्ण आहे. तेज ह्यालाच इंग्रजीत Vitality म्हणतात. हें तेज जर शरीरांत नसलें तर मनुष्य बाह्यतः पुष्ट दिसला तरी कोणत्या रोगाला केव्हां बळी पडेल ह्याचा नियम नाहीं. म्हणून विषयासक्तीनें स्त्रीपुरुषांनी आपल्या तेजाची हानि करूं नये. सुतासाठीं मणी फोडणे केव्हांहि शहाणपणाचें होणार नाहीं.br>  असो. स्त्रियांना आजमित्तीस स्वच्छ हवेची आणि व्यायामाची जरूरी फार आहे. पांढरपेशांच्या वायकांकरतां व्यायामाची कांहींहि सोय कोठें केलेली नाहीं. व तिकडे समाजाचें अद्यापि लक्ष्यहि गेलें नाहीं. खेड्या- पासून तों शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहण्याकरतां जलाशय व क्रीडा- विनोदादिकांकरतां प्रशस्त उद्यान, इतकी योजना झालीच पाहिजे. गरीव स्थितीतल्या स्त्रियांना कामे करावी लागतातच; पण मुबलक शुद्ध हवा त्यांस मिळत नाहीं. प्रत्येक स्त्रीपुरुषाला पोहतां आलेच पाहिजे. स्त्रियांना पोहण्यानें एक कला तर अवगत होतेंच; पण शिवाय उघड्या हवेत व्यायाम घेतां येतो. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धां स्त्रियांकरतां स्वतंत्र उद्यान नाहीं, अथवा पोहण्याची सोय नाहीं, ह्यावरून स्वतंत्र विचारांचें बीं अद्यापि आमच्याकडे रुजत नाहीं, असेंच सिद्ध होतें. रामायणभारत- कालीं गांवोगांवीं अशीं उद्यानें असून स्त्रिया त्यांचा उपयोगहि करीत. “ श्रमो हि सर्वो विफलः सुखैषिणां विना विहारोपवनानि निश्चितम् ”.br>

५५