पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

जागेचें आणि मनुष्यसंख्येचे प्रमाण कायद्याने ठरलें नसल्यामुळे नाकपु- डीएवढ्या जागेत मानवी दसकडीला निर्वाह करावा लागणें हैं ह्या औद्यो- गिक युगांत अपरिहार्य तर खरेंच, पण आरोग्याला अत्यंत अपायकारक आहे. त्यांतहि ही रहाणी फारच अपायकारक होते. कोंदट हवेंत जन्म कंठणाऱ्या स्त्रिया प्रसन्नमुख कशा राहणार ? शहरापेक्षां खेडेगांवची स्थिति कांहीं वरी. पण खेड्यांतहि अलीकडे स्त्रियांना मोकळी हवा मिळत नाहीं. घराच्या पुढील अंगण पुरुषांकरितां व मागील स्त्रियांकरतां अशी जुनी वहिवाट, पण दारिद्र्यामुळे अंगनांच्या अंगणावर सुद्धां पुरुषांचें अति- क्रमण होऊं लागलें. तात्पर्य, स्त्रियांच्या शरीरसंपत्तीचा -हास होऊ न देणें हें अत्यंत आवश्यक आहे. परंतु ह्याबद्दल दुमत असण्याचा संभवच नाहीं.
 स्त्रियांच्या शारीरिक व नैतिक विकसनाला पुरा वाव आहे तसा बौद्धिक उन्नतीला नाहीं काय ? वस्तुतः बौद्धिक उन्नतीचें प्रस्थ ह्या व्यापारी युगांत फाजील माजलें आहे. आत्मोन्नतीला अथवा समाजस्थैर्याला मान- सिक किंवा नैतिक विकसनाची जितकी आवश्यकता आहे तितकी बौद्धिक वाढीची नाहीं. बुद्धिमेधा (Intellect) हें इंद्रिय शारीरिक सुखां- करतां परमेश्वरानें मनुष्यास दिले आहे. बुद्धीच्या योगानें आपणांस पोट भरतां येतें इतकेंच. निर्बुद्ध अथवा असंस्कृत बुद्धीचीं माणसें सुशील असूं शकतात. अर्थात् बुद्धि हें साधन आहे, साध्य नाहीं. पण साधना- चेंच सध्यां स्तोम माजवण्यांत येत आहे. साध्याविषयीं घातकी बेफि- किरी दिसण्यांत येते. बुद्धचा उपयोग आपला व्यवहार आपणांस कुश- लतेनें करतां याचा हा आहे. आतां स्त्रियांचें नियोजित कार्य जर शिशु- संवर्धन आणि गृहव्यवस्था हें आहे, तर त्यांनी एतद्विषयक नैपुण्य कमा- वण्याचा अट्टाहास धरला पाहिजे. पण सध्यां विपरीत भावना स्त्रियांमध्यें उत्पन्न झाली आहे. कोणी बी. ए. होतील; कोणी एम् ए. होतील; कोणी एल. एल. बी. होतील. शिक्षणाकरतां सध्यां मुली शिकत नाहींत; मग

५६