पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्थिक स्पर्धा.

स्त्रीयांच्या आरोग्याकडे लक्ष्य द्यावयास पाहिजे तितकें दिलें जात नाहीं. सुशिक्षित स्त्रिया परीक्षा पास होण्याच्या चिंतेनें मरगळ - तात, तर अक्षरहीन स्त्रिया आपल्याच मूर्खपणामुळे यमाधीन होतात. ह्यांना स्वतः अक्कल नाहीं, पथ्यापथ्य हितानहित समजण्याची कुवत नाहीं, आणि दुसऱ्याचें ऐकण्याइतका अंगी नरमपणा नाहीं. सध्यां आमचा समाज अराजक स्थितीत आहे. घरांत काय किंवा घराच्या बाहेर काय, कोणा- च्याहिबद्दल, मग तो कितीहि विद्वान असो, कितीहि अनुभवी असो, कितीहि सच्छील असो, कोणालाहि आदर वाटत नाहीं. ह्याचा परिणाम म्हणजे प्रत्येकाचें मनसोक्त वर्तन होय. ह्या दृष्टीनें विचार करतां सध्यां शिक्षणाचा प्रसार न होतां संकोचच झाला आहे असें म्हणावें लागतें. शाळेच्या बाहेर शिक्षण मिळविण्याचे आजपर्यंत जे असंख्य मार्ग होते ते सर्व बंद झाले. पूज्यबुद्धि अनुकरणशीलता उत्पन्न करते, म्हणून विद्यायुतांच्या विद्येचा लाभ अविद्यांना सहजासहजी मिळतो. आणि अशा रीतीनें अशिक्षितांवरहि विद्यार्जनाच्या चकारींतून गेल्यावांचून विद्येचे संस्कार घडत असतात. ह्या लाभाला आजचा समाज मुकला आहे. दुसऱ्याच्या ज्ञानाच्या अनुभवाचा फायदा घेण्याची बुद्धि तरुण मुलांमुलींना होत नाहीं. त्यामुळे अपरंपार अनर्थ समाजावर ओ आहेत. त्यांपैकीं शारीरिक व्हास हा एक होय. शरीरसामर्थ्य वाढवावें कसें हें जसें शास्त्र आहे तसेंच शरीरहानि कशी होऊ देऊं नये हैं शास्त्र आहे. पण इकडे कोणाचें लक्ष्यच नाहीं. व्यायामादि उपायांनी शरीरबल वाढविलें तरी पण अनाचारांनी शरीरहानीचा ओघ उतरवट प्रणालिकें-

५४