पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

-हासाच्या कारणांचा विचार करण्यास कमिशन वसलें असतें. 'विकृतिः- प्रकृतिः शरीरिणाम्' असा सध्यां नियमच होऊन बसला आहे.
 दुखण्याची जवाबदारी आपल्यावर नाहीं अशीच प्रायः बहुतेकांची समजूत असते. ती एक दैवी आपत्ति आहे असें आपण मानतों. पण हा चुकीचा समज आहे. दुखणे म्हणजे आपल्या प्रमादांचा परिणाम होय. तेव्हां दुखणें आलें असतां आपणांस त्याची लाज वाटली पाहिजे. दुसऱ्याला आपल्या दुखण्याची कहाणी सांगतांना आपण आपल्या पापांचीच वस्तुतः कहाणी सांगत असतो. परंतु ही जाणीव पुष्कळांस नसते. सांसर्गिक रोग वगळले तर आपलें कोठें तरी चुकल्याशिवाय दुखणें येत नाहीं आणि सांसर्गिक रोगाचें वीं सुद्धां आपण पोखरून ठेवलेल्या शरीरांतच प्रवेश करूं शकते. करितां दुखण्याची सर्व जबाबदारी आपणांवर आहे हैं विसरतां कामा नये. विषयातिसेवन, अव्यवस्थित खाणेपिणे, पौष्टिक अन्नाची कमतरता, व्यायामाचा अभाव, पोटाची चिंता, गुलामगिरीची नामुष्की, इत्यादि अनेक कारणांनी स्त्रीपुरुषांची शारीरिक अवनति झाली आहे. गृहस्थाश्रम्यांकडून ब्रह्मचर्य पाळले जात नाहीं. स्त्रीसंग हा प्रजो- त्पादनाकरतां आहे, तेव्हां प्रजोत्पादनाचा संभव नसतां स्त्रीसमागम करणें म्हणजे व्यभिचार होय. तसेंच क्षुधा नसतांना वाटेल त्या वेळी व वाटेल तेथें खाणें ह्यानेंहि शरिरांत विकार उत्पन्न होतात. आहारासंबंधानें अत्यंत नियमितपणा ठेवावा लागतो. पण हल्लींच्या पिढीला कोणत्याहि गोष्टींत नियमितपणानें वागणें माहितच नाहीं. मध्यम वर्गांतील स्त्रिया तर जगतात कशा ह्याचेंच आश्चर्य वाटण्यासारखे आहे. स्वयंपाकघरां- तून ओटीवर येण्याचा सुद्धां प्रसंग सान्या जन्मांत येणें कठीण. त्यामुळे स्त्रियांना शुद्ध मोकळी हवा मिळणे म्हणजे गरीबाला घिमानांत बसण्यास मिळण्याइतकें दुर्घट कर्म झाले आहे. घरांतलें काम करण्यांत कमीपणा वाढूं लागला; व्रतादिकांवरचा विश्वास उडाला; आणि सहल आदि

५२