पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शारीरिक -हास.

होय, एवढेच नव्हे तर आजारी मनुष्य हा हिणकस ( depreciated) नाण्याप्रमाणेंच होय. कारण त्याचा आजार जाण्याकरतां आणखी पैसे ओतावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रचंड शक्तीचा प्रत्यहीं व्यय होऊं देणें हें राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत अनिष्ट होय. जन्ममृत्यूच्या संख्येबरोवर आजायांची संख्या लोकांना कळण्याचें साधन असतें तर वरें झालें असतें. वर्षांतून दोन तीनदां आजान्यांची गणती सरकारनें कां करूं नये ? मुंबई इलाख्यांत पन्नास हजार खेडी आहेत असें म्हणतात. तेव्हां दर- दिनीं पन्नास हजार माणसांकडून होणाऱ्या कामाला आपण मुकतो. एका खेड्यांत एकच मनुष्य आजारी असतो असें एथें धरलें आहे. हे प्रमाण अगदीच कमी आहे त्यांत शंका नाहीं. तरी सुद्धां एका माणसाची रोजची उत्पादनशक्ति चार आणे किंमतीची आहे असे मानले असतां फक्त मुंबई इलाख्याचें रोजचें सांडेबारा हजारांचें नुकसान होत आहे. असें अनुमान करण्यास प्रत्यवाय नाहीं. ह्या आर्थिक हानीचे भयंकर स्वरूप बघून तरी आजारी न पडण्याचा प्रयत्न करणें हें प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अलीकडे मुलांमुलींचा शारीरिक व्हास झपाट्याने होत आहे. निःसत्व, खुजी, मरणकळा आलेलीं अशीं माणसें कोणता पुरुषार्थ साधणार ? राज- कीयदृष्ट्या सुद्धां हैं आमच्यांत मोठेच वैगुण्य आहे. आह्मां वुटबैंग- णांचें वजनच साहेबांवर पडत नाहीं. आमच्या शब्दाला साहेबांनीं वच- कावें असें वाटत असेल तर त्या शब्दाचें अधिष्ठानहि दहशत वसेल असेंच पाहिजे. उंच बांधा, धिप्पाड, पीळदार व कणखर शरीर, बळकट स्नायुं, उमदा चेहरा, आणि बुद्धिमत्ता व निप्रहृदर्शक मुद्रा अशा साधनांनीं युक्त असलेलीं माणसेंच आपली छाप दुसऱ्यावर बसवूं शक- तात. म्हणून उत्तम शरीर हें स्वराज्यप्राप्तीचें प्रमुख साधन मानले पाहिजे. तात्पर्य, शब्दाची किंमत शरीरावर असते म्हणून शरीराची हेळ- सांड करणें मूर्खपणाचे आहे. स्वराज्य असतें तर आमच्या शारीरिक

५१