पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

साची योग्यता ओळखणारा शत्रु हुडकला असतांहि सध्यां आढळणार नाहीं.
 स्त्रियांच्या कर्तृत्वाला आमच्या समाजांत वाव नाहीं असा एक आरोप वारंवार केलेला आढळतो. व नुसत्या शब्दांनीं झुकणारे अप्रबुद्ध लोक समाजांत बरेच असल्यामुळे ते स्त्रियांना " हक्क " देण्यास तयार होतात; व अशा रीतीनें आपल्या उदार मताचें प्रदर्शन करण्याची संधि ते वायां दवडीत नाहींत. आतां कर्तृत्व हें शारीरिक, मानसिक अथवा नैतिक, तसेंच वौद्धिक असें त्रिविध असू शकते. आतां गृहाला चिकटून स्त्रियांना नैतिक उन्नति करून घेण्यास व आदर्शभूत असें नैतिक आचरण ठेव- ण्यास अवसर नाहीं असें कोण म्हणेल ? शारीरिक उन्नति करून घेण्याच्या कामी तरी स्त्रियांच्या आड कोण येणार ? आजच आमच्या महाराष्ट्र स्त्रियांची अवस्था चिंताजनक झाली आहे. एक मूल झालें नाहीं तोच यमदूताचा पाश त्यांच्या मानेभोवती वसतो. क्षयरोगादि विकारांना वळी पडणाऱ्या तरुण बालिकांची संख्या कोणाचेंहि हृदय विदारून टाकील. तारुण्याचा तजेला कोणत्याहि मुलीच्या चेहऱ्यावर दिसत नाहीं. नवतीच्या बहराची उणीव भपकेबाज वस्त्रांनी भरून काढावी लागते. हिमकालांतील शुष्कलतांप्रमाणें रसहीन असलेल्या या बालिका गृहिणीधू झेपण्यास अपात्र होतात हें स्वाभाविकच आहे. जिवंत कशा राहतील हीच जेथे काळजी, तेथे गृहिणी कशा निपजतील हा विचार अप्रस्तुतच समजला पाहिजे. आरोग्य ही संपत्ति आहे. माणसानें काम करणें म्हणजे पैसे मिळवणें होय. पण रोगी माणसाच्या हातून काम कसें व्हावें ?"मृतकल्पा हि रोगिणः ”: रोगी म्हणजे मृत्यूच्या मार्गाला लागलेली माणसें. अशी कल्पना करा की, मुंबई इलाख्यांत दररोज सरासरीने दहा हजार माणसे आजारी असतात. आतां ह्रीं माणसें आजारी नसती तर ह्या दहा हजार माणसांच्या श्रमाचें मोल किती झालें असतें ह्याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. अर्थात् आजार म्हणजे द्रव्यहानि

५०