पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहसुख.

 शेवटी, पत्नीनें पतिवश झाल्याविना विवाहसुस उभयतांपैकी कोणा- लाहि मिळणार नाहीं. पतिवत्नी स्त्रीने देशहिताच्या मिषानें जगभर सैरा- हिंडत सुटणें हा पत्नीधर्म कोणत्या शास्त्रांत सांगितला आहे ? क्षण- भर शास्त्राची कोणी परवा करणार नाहीं म्हणून तेंहि सोडून देऊं. आणि केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीनें विचार करूं. घराच्या बाहेरील गोष्टींत अशी स्त्री पडली की, कुटुंबाला ती आंचवलीच. म्हणजे एका कुटुंबाचा विघात झालाच. पति पत्नीविरहित राहणार; मुलांच्या शिक्षणाची आबाळ होणार. वरें कुटुंबविघात करणारी ही स्त्री देशहित किती करणार ? ला- करतां पुरुष नाहींत काय ? कुटुंबांत राहून कौटुंबिक जबाबदारी पूर्ण- पर्णे संभाळूनच साधेल तें देशहित करणें हें स्त्रियांचे कर्तव्य. प्रसंगांती स्त्रियांनीं पुढें येऊन पुरुषी कामे केल्यास तें युक्तच होईल. पूर्वीच्या काळी झांशीच्या लक्ष्मीबाईनीं नाहीं कां तरवार पाजळून पुरुषांकडून होईना तो पराक्रम करून दाखविला ? पण प्रसंगाभावीं, पुरुषाचें उच्चाटण करून पुरुषी कामे करूं लागल्याने सामुदायिक कल्याणांत भर पडली असें म्हणतां येणार नाही. उलट पतीकडे दुर्लक्ष्य केल्याचे पातक मात्र पदरी पडणार. पूर्वी पतीलाच स्त्रिया तीर्थ म्हणून मानीत. तर आतां तरी पती- लाच देश म्हणून त्यांनीं कां मानूं नये ? पतीच्या द्वारें देशहित करण्याला काय थोडा अवसर आहे ? पण " नवनवगुणरागी प्रायशः सर्वलोकः "




४७