पान:गच्चीवरील गप्पा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शारीरिक -हास.

माज करून राहण्याचा हेतु इतकाच कीं, प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक आणि सात्त्विक उन्नति शक्य तितकी पूर्णाशाने व्हावी. समाजाशिवाय अशी उन्नति होणें शक्य नाहीं; आणि हेंच कार्य सिद्धीस नेण्यास समा-- जांतर्गत कुटुंबसंस्था उत्कृष्ट प्रकाराने सहाय्य करते. आईबापाचे रोग दोन पिढ्या सोडून पुढल्या संततीतहि प्रादुर्भूत होतात. ही गोष्ट शास्त्र- सिद्ध व अनुभवसिद्ध आहे. “ यदेनसो मातृकृताच्छेषे पितृकृताच्च यत् ”: आई बापांच्या दुराचणामुळे तुला जी व्यथा झाली आहे, ( ती मी दूर करतो, ) असा एक वैदिक मंत्र आहे. आईबापाचे रोग जर पुढील पिढीला बाधा करूं शकतात तर मातापितरांची निरामयता भावी संततीचें हित कां करूं शकणार नाहीं ? तेव्हां ह्या आनुवंशिक संस्काराचा लाभ संततीस मिळवून देण्यास कुटुंबसंस्थेवांचून दुसरें उत्तम साधन नाहीं. पण कुटुंबसंस्थेचें मूल दृढबद्ध होण्यास विवाहसातत्य आवश्यक आहे. तथापि विवाहसुखाशिवाय विवाहसातत्याची किंमत नाहीं; आणि विवाहसुखावाप्ति पतिपत्नींचा परस्परांविषयीं आदरभाव असेल तरच शक्य आहे. भार्या ही सर्वस्वी पतिवश असावी, पतिसेवा हाच तिचा धर्म, हें जसें स्मृतिकारांनी सांगितलें आहे तसेंच पतीनेंहि आपल्या भार्येशी आदरपूर्वक वागावें असा निर्बंध घालून दिला आहे. " शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम् " (मनु): जेथें स्त्रियांना दुःख होतें तें कुल तत्काल नष्ट होतें. व्यास म्हणतात, सदाचारी भार्येचा त्याग कर- णारा पति धर्मभ्रष्ट होतो (सद्वृत्तचारिणीं पत्नी त्यक्त्वा पतति धर्मतः ). कात्यायन आणि दक्ष यांच्या मतें पत्नीची अवहेलना करणारा पुरुष अन्यजन्मी स्त्रीच होतो. स्त्रियांच्या जन्मागत पारतंत्र्यामुळे त्यांना सन्मा-

४८