पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहसुख.

एक मुख्य तत्त्व आहे. पूर्वी युरप खंडांतसुद्धां विवाह हीर आहे, अशीच भावना होती. रशियांतील विवाहपद्धतीचे वर्णन तर आमच्या पद्धतीशीं पुष्कळ हिश्शांनी जुळतें.
 "I should also add that marriage in Russia is en- tirely indissoluble, that no kind of relationship with- in the fifth degree is permitted......that a priest can never marry a second time, so that a priest's wife is as much cherished as any other thing that cannot be replaced." (A Residence on the Shores of the Baltic, Vol. III, 84. )
 विवाहनिवृत्तीचा हक्क स्त्रियांना न दिल्यानें कांहीं स्त्रियांना आयुष्य कंठणें असह्य होईल हें नाकबूल करणें शक्य नाहीं. पण तसा हक्क दिल्यानें बहु- तेक स्त्री-पुरुष असंतुष्ट राहतील त्याची वाट काय ? मनोविकार परिस्थि- तीप्रमाणें बनत असतात. लग्नविमोचनाचा हक्क स्त्रियांस दिल्यानें त्यांना स्वातंत्र्य अधिक मिळतें ह्यांत संदेह नाहीं, पण मग कुटुंबस्थैर्य राखतां येणें शक्य नाहीं. ह्यावर तुमच्या कुटुंबाकरतां आमचा बळी कां घेता, असा सवाल स्त्रियांकडून येण्याचा संभव आहे. त्याचें उत्तर हेंच कीं, तुमच्या ऐवजीं कुटुंबाचा बळी दिला तरी पण तुम्हांला सुख लाभत नाहीं तें नाहींच. मग कुटुंबाला लाथ मारून राष्ट्रवैकल्याला कारणीभूत तरी कां होता ? स्त्रियांना पुरुषांनीं परतंत्र केले हा आरोप वृथाभिमानाचा आहे. परमेश्वरानेंच स्त्रियांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतलें आहे, ही गोष्ट दृष्टिआड करून आपली निष्कारण फसवणूक कां करून घ्यावी ? एकंदरीत वैवाहिक सुखाला विवाहसंबंध कायमचाच पाहिजे. नाहींतर लग्नमंडप घरासमोर कायमचे उभारून ठेवावे लागतलि. "उत्पादनमपत्यस्य जातस्य परिपालनं " ह्याकरतां आजन्म एकच कुटुंब करून राहण्यांत स्त्रियांचे कल्याण आहे.

४५