पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

आणि हें सामर्थ्य असेल तरच मनुष्यत्व आपसांस प्राप्त करून घेतां येईल. अलीकडे तरुणांना त्यांच्या नटवेपणावरून व चारगट आचरणा- वरून बायका होण्याची हौस वाटत आहे असा भास होतो. पण संसारसुखाला फार घातक होतें. सिंहाची शक्ति आपल्या अंगांत आणण्याचा हव्यास प्रत्येक तरुणानें बाळगला पाहिजे. शास्त्राच्या भाषेत बोलावयाचें म्हणजे प्रत्येक पुरुष प्रथम रतिसमरशूर असला पाहिजे. पति रतिशूर, गुणी व सज्जन असा असून स्त्री सहजसुंदर, पतिवश, बुद्धिमती व संसा- 'रदक्ष अशी असली तर त्या भाग्यशाली जोडप्यास संसारसुख लाधण्यास अडचण पडणार नाहीं. “ प्रजां प्रजनयाव है संप्रियौ रोचिष्णू सुमनस्य- मानौ जीवेव शरदः शतम् ” (आपण प्रजा उत्पन्न करूं, एकमेकांवर प्रीति करूं, आपण एकमेकांस आवडती होऊं, आपलीं मनें परास्परांविषयीं निष्कलंक राहतील असें आपण करूं आणि अशा रीतीनें शंभर वर्षे जगूं,) हा जो मंत्र विवाहाच्या वेळेस म्हटला जातो त्यांतलें इंगित प्रत्ये- कानें मनांत वाळगलें पाहिजे. विवाह होतांच आपण प्रेमानें वागूं असा निर्धार वधूवरांनी केला पाहिजे. विवाह ही वधूवरांची निर्गांठ आहे, निसरगांठ नाहीं हें कोणीहि विसरतां कामा नये. विवाहबंधनें ताडकन तोडतां येतात असें झालें तर प्रेमाचा विस्तार होण्यास योग्य मनोभूमि मिळणार नाही. “ न निष्क्रयविसर्गाभ्यां भर्तुर्भार्या विमुच्यते ". एकदां घडलला संबंध मोडतां येत नाहीं असा मनूनें निर्बंध घातला आहे तो विचारपूर्वक घातलेला दिसतो. हा मानसशास्त्राचा, मनुष्यस्वभावाचा, विषय आहे. झालेला विवाह मोडतां येण्यासारखा असला म्हणजे परस्प- रांना आवडती होण्याचा प्रयत्न कोणाकडूनच कसून होत नाहीं. ह्यावरून असे दिसून येतें कीं, विवाहसुखाला आवश्यक अशी पहिली गोष्ट म्हणजे विवाहग्रंथि अभेद्य पाहिजे. अलीकडे लग्न हैं कराराच्या स्वरूपाचें आहे असें मानण्याकडे लोकमत झुकत चाललें आहे. नवीन संस्कृतीतील हैं

४४