पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विवाहसुख.

{{xx-larger|ज्या}} शिक्षणाचा वर निर्देश केला आहे तें अर्थात्च विवाहित स्त्रियांचे शिक्षण होय. अविवाहित अथवा गतभर्तृका स्त्रिया पुरुषवजाच समजल्या पाहिजेत; व त्या जर संतानहीन असतील तर त्यांचा स्त्रिया म्हणून विचार करण्याचें वस्तुतः कारणच नाहीं. सध्यांच्या काळांत सुशिक्षित स्त्रियांची आवश्यकता नाहीं हें म्हणणें साहसाचें होईल. देवानें ज्यांना बुद्धि दिली आहे अशा मनुष्यजातीपैकीं निम्मी जात अज्ञानांत ठेवून मानवी प्रगतीला खीळ घालण्यास कोणीच उद्युक्त होणार नाहीं; शिवाय कुटुंब व संसार चालवण्यास उपरिनिर्दिष्ट शिक्षणाची जरूरी आहेच. पण ह्रींहि कारणें बाजूस ठेविलीं तरी पुरुष विद्यासंपन्न झाल्यावर निरक्षर अशा सहचरीवर त्याचें मन कसें वसावें ? पति व पत्नी ह्यांमध्ये शिक्षणविषयक अंतर जर फार असेल तर दोघांचीं अंतःकरणें एकमेकांना न समजल्यानें घरांत नेहमीं घासाघीस होईल. “ देव म्हणे, सुदति, वृथा वरिलें मातें अलोकरीतीनें” असें कृष्णानें थट्टेनें रुक्मिणीस म्हटलें आहे. पण हा प्रश्न प्रत्येक नवरा आपल्या बायकोस गंभीर वृत्तीनें विचारावयाला गेला तर नवऱ्याची योग्यता अक्षरशून्य बायको कशी ओळखणार ? " गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणः " म्हणून संसार सुखजनक होण्यास स्त्रिया सुशिक्षित असणें अवश्य आहे.
 मार्गे सांगितल्याप्रमाणें विवाहोत्तर — विवाहापूर्वी नव्हे—स्त्रीपुरुषां- मध्यें अनन्य प्रेमभाव उत्पन्न झाला पाहिजे. ह्याकरतां प्रथम पुरुषानें पुरुषत्व कमावलें पाहिजे. आपण पशुयोनीतून मनुष्ययोनीत आलों आहों; तेव्हां पशुकार्य करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगांत असलें पाहिजे.

४३