पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

दारी पुरुषावरच पडते. ह्याचा स्पष्ट अर्थ असा कीं, पुरुषाला आपलीं कामें संभाळून शिवाय वायकांचीहि कामे करावी लागतात. त्यामुळें पुरुष लवकरच मेटाकुटीस येतो. " संनद्धातिथिसत्कृतौ ग्रहभरे नैस्तन्द्रमा- विभ्रती" असें विद्यमानकालीं किती स्त्रियांच्यासंबंधानें म्हणतां येईल ? ज्या योग्यतेचा पाहुणा येईल त्याचा त्याच्या योग्यतेनुरूप आदरसत्कार किंवा विचारपूस स्त्रियांकडून होते काय ? असल्या गोष्टींकडेहि पुरुषांनाच स्वतः लक्ष घालावें लागतें. पाहुण्याचा औत्सुक्यानें सत्कार करणारी मावली तर सध्यां विरळाच दिसते. कोणत्याहि वायकोला नोकरांना सांभाळून घेतां येत नाहीं. हाताखालीं कोणीहि माणूस न टिकणें हें आमच्या स्त्रियांच्या दुःखभावाचे निदर्शक नाहीं असें कोण म्हणेल ? कोणत्याहि घरांत जा,-- विशेषतः नोकरचाकर नाहींत अशा - तेथें स्वच्छता तुम्हांला आढळणार नाहीं; टापटीप निदर्शनास येणार नाहीं; वक्तशीर कामे झालेली दिसणार नाहीत; जागच्या जागीं वस्तु ठेविली जाते असा अनुभव येणार नाहीं; सौंदर्य- शास्त्र पाळलें जातें असा प्रत्यय मिळणार नाहीं. ह्याचा सर्व दोष स्त्रियांच्या माथीं मारणें अनुचित होणार नाहीं. सर्व घर हंसतमुख दिसलें पाहिजे. घरांत गेल्याबरोबर आनंदवृत्ति उल्लसित झाली पाहिजे. कुटुंब पृथ्वीवरील खर्ग होय. आणि हा खर्ग तादात्म्याशिवाय बनत नाहीं. पण हक्काचें बीज पेरल्यानें कुटुंबसुखाचा विध्वंस झाला आहे. सध्यांचे आमचें कुटुंब म्हणजे त्याला धर्मशाळा पाहिजे तर म्हणा, पाहिजे तर खाणावळ म्हणा, पण ह्याहून त्याची वरची पायरी लागणार नाहीं. “ क्रोशन्तः शिशवः सवारि सदनं पङ्कावृतं चाङ्गणं । शय्या दंशवती च रूक्षमशनं धूमेन पूर्णं गृहम् ॥ भार्या निष्ठुरभाषिणी प्रभुरपि क्रोधेन पूर्णः सदा । स्नानं शीतलवारिणा हि सततं धिग्धिग् गृहस्थाश्रमम्। हाच प्रकार. थोड्या फार फरकाने सर्वत्र हल्ली दृष्टीस पडतो.


४२