पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रियांचे शिक्षण.

चाटते. हिंदूंचे सर्व आयुष्य धर्मकृत्यांत जात असून हिंदु स्त्रियांना त्याविषयीं कांहीं माहीत नसावें हैं किती अजब आहे वरें ? आजच्या विद्वानांना पुराणांत शिमगा दिसतो. पण शिमगा टाकून वैशाख असेल - तो घेण्यास तर हरकत नाहींना ? पुराणांत उदात्त नीतितत्त्वें धर्म- शास्त्रांचे नियम, इतिहास, इत्यादि अनेक विषय ग्रथित केले आहेत. त्या सर्वांचा इष्ट परिमाण वाचकांवर झाल्यावांचून राहणार नाहीं. नुसत्या भारताचे अध्ययन आमच्या स्त्रियांनी केलें तरी, बहुश्रुतपणा, विद्वत्ता, 'विवादकौशल्य, इत्यादि अनेक गुण त्यांच्या ठिकाणीं अवतीर्ण होतील. नंतर सर्व धर्मांचा इतिहासहि त्यांस अवगत असावा. हिंदुस्थानचा इति- "हास, जगाचा भूगोल, आजपर्यंत होऊन गेलेल्या साम्राज्यांचा त्रोटक इतिहास, ह्यांचें अध्ययनहि स्त्रियांना अनावश्यक नाहीं. शिवणकाम, कशिदा, गायनवादन, चित्रकला ह्यांच्याप्रमाणें वैद्यशास्त्राचा अभ्या- सहि प्रत्येक स्त्रीने केलाच पाहिजे. इतिहासाबरोबर प्रचलित राजकार- 'णाची माहिती बहुधा होतेच. मुलांच्या विचारांना योग्य वळण लाव- ण्यास राजकीय विषयांचे ज्ञान स्त्रियांना फारच उपयुक्त होतें. तसेंच आरोग्यशास्त्र, वनस्पति-व रसायनशास्त्रांची मूलतत्वें ह्यांवांचून तरी स्त्रियांचें – गृहिणींचें — कसें चालणार ?
 वरील कसोटी लावली असतां हल्लींच्या स्त्रिया किती मागसलेल्या आहेत ह्याची कल्पना करतां येते. स्त्रीजातीचे जन्मतःच असलेल दुर्गुण अर्धवट क्षिक्षणानें द्विगुणित मात्र होतात. सध्यां पुरुषांना स्त्रियां- पासून कसलेंहि साहाय्य मिळत नाहीं. एवढेच नव्हे तर पुरुषांचे आयुष्य दुःखी, कष्टी आणि अल्पकालीन करण्यालाच त्या कारणीभूत होतात. सर्व स्त्रिया हल्लीं ऐदी, चैनी, अविचारी, डामडौली व पतिसुखाविषयीं बेफिकीर अशा बनत चालल्या आहेत. ह्यामध्यें त्या बहुतांशी पुरुषांचा कित्ता गिरवीत आहेत हे मात्र खरें. घरामधील सर्व कृत्यांची जवाब-

४१