पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

तात तें आमच्याकडे नाहींच म्हटलें तरी चालेल. मग कुटुंबसुखाची गोष्टच काढावयाला नको. ह्या सर्वांचें कारण हल्लींच्या अशिक्षित अथवा विशिक्षित स्त्रिया होत. गर्भधारणा व प्रसूति ह्यांकरतां पुरुषांपेक्षां स्त्रियांना गृहाची जरूरी अधिक भासते. पुरुषांचें काय ? ' घर ना दार, देवळी विन्हाड ' अशी स्थिति असणें अशक्य नाहीं. तेव्हां हें घर स्त्रीस पती- पासून प्राप्त होतें. तसेंच स्त्रियांचे नैसर्गिक दौर्बल्य विचारांत घेतां त्यांच्या जीवाच्या व अब्रूच्या संरक्षणाची जवाबदारी आयतीच त्यांच्या पतीवर पडते. स्वातंत्र्योन्मुख स्त्रियांनी या गोष्टीचा नीट विचार करावा. असो. वरकारभार व मुलांचें पालनपोषण हीं चांगल्या रीतीनें करता येण्यास स्त्रियांना योग्य व चांगले शिक्षण मिळणें अवश्य आहे. मराठी स्त्रियांवि- पयींच बोलावयाचें झालें तर प्रत्येक स्त्रीला मराठीचें पूर्ण ज्ञान झालें पाहिजे. मराठी भाषेचें शास्त्र या दृष्टीनें तिनें अध्ययन केलेलें असावें. मराठीमधील उत्तम ग्रंथांचे परिशीलन असणें अगत्याचें आहे. संस्कृ- तांत तिची वरीच प्रगति झाली पाहिजे म्हणजे; कोशाच्या साहाय्यानें प्रत्येक स्त्रीला पुराणग्रंथ वाचतां आले पाहिजेत. संस्कृत व मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची थोडीबहुत माहिती असलीच पाहिजे. इंग्रजीचें ज्ञान कामच- लाऊ असले तरी पुरें आहे. पण हल्ली इंग्रजीला फाजील महत्त्व दिलें जातें हैं सर्वथैव अनिष्ट होय. सांप्रत हिंदु स्त्रियांना उपयुक्त अशी कोण- तीहि शिक्षणसंस्था की जिला हिंदुशिक्षणसंस्था म्हणतां येईल अशी अस्तित्वांत नाहीं. हिंदु स्त्रियांकडून धर्मशास्त्रे म्हणजे स्मृतिग्रंथ वाचून घ्यावयास नको काय ? त्याचप्रमाणें ज्योतिषशास्त्राचेहि सामान्य ज्ञान त्यांस कां नसावें ? संस्कृताच्या अध्ययनानें मनुष्य कर्मठ व संकुचित वृत्तीचा वनतो असा समज आमच्यापैकी कित्येक विश्वविद्यालयांतील पंडि- तांचा झालेला आहे. पण हा ग्रह साफ चुकीचा आहे. उलट संस्कृत ग्रंथांच्या अध्ययनानें मनुष्य नास्तिक बनण्याचीच भीति कित्येकांना

४०