पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रियांचें शिक्षण.

स्त्रित्यांनी लग्न करणें हें समाजदृष्टधा जितकें इष्ट आहे तितकेंच निसर्गतः तें आवश्यक आहे. लग्नोत्तर प्रजोत्पादन व प्रजासंगोपन ह्रीं त्यांच्या मागें लागलींच; व हे दोन व्यवहार असे आहेत की, स्त्रियांचे पाय घरांतच अडकले पाहिजेत. म्हणजे स्त्रियांना दाराच्या बाहेरचा कोणताहि व्यवसाय करतां येणें शक्य नाहीं. सृष्टिक्रमाच्या विरुद्ध जाऊन जर त्यांनी बाह्योद्यम आरंभला तर रोडावलेल्या स्त्रियांच्या हाडकलेल्या पिशाच- रूपी मुलांनी सर्व देश व्यापून जाईल आणि अशा मेषपात्र बनलेल्या राष्ट्राला कोणालाहि सहज लाथाडतां येईल. आणि मग शिशुसप्ताहा - सारखीं सोगें असंख्य काढलीं तरी तेजस्वी राष्ट्र होणें शक्य नाहीं. हीं आपत्ति टाळावयाची असेल तर स्त्रियांनी आपले बुद्धिसामर्थ्य शिशुवर्धनां- तच खर्ची घातलें पाहिजे. शिशुवर्धन व गृहव्यवस्था हीं दोन कृत्यें चोख रीतीने करण्याची पात्रता सध्यां स्त्रियांच्या अंगांत नसल्यामुळे एखादें नमुनेदार कुटुंब पाहण्यास किती प्रवास करावा लागेल कोणाला ठाऊक ! सांप्रत तर आमच्या कुटुंबांची स्थिति चमत्कारिक झाली आहे. स्त्रियांचा उपयोग ह्या दोनहि कामी व्हावा तसा होत नसल्यामुळे त्यांचे काम पुरु- षांनाच करावें लागतें. ह्याचा परिणाम असा होतो कीं, कोणतेंच काम चांगलें होत नाहीं. मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ती सुविनीत होत नाहींत. तसेंच कामाच्या दुहेरी बोजामुळे यजमान अकाली मृत्युमुखी पडतो; आणि घरांत पैशाचा धूर निघत असला तरी टापटिपीसंबंधाने म्हणाल तर आंवळ्याएवढें पूज्य ! हल्लींचीं मुलें आईपेक्षां वापाभोंवतींच अधिक असतात ह्याचा विचार केला म्हणजे आमच्या आयांची कर्तव्य- पराङ्मुखता चांगलीच प्रत्ययास येते. हल्लीं कुटुंब म्हणून ज्याला म्हण-

३९