पान:गच्चीवरील गप्पा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

स्त्रीनें आपल्या धर्माप्रमाणे वागावें. हक्कांबद्दल हाणामाऱ्या होतात तशा धर्मावद्दल होत नाहींत. धर्म, कर्तव्य, ह्यांविषयीं निष्ठा, भक्ति उत्पन्न होते. हक्कांविषयीं अभिमान उत्पन्न होतो, समाजामध्यें नेहमी खळबळ चालू असते, असंतोष माजतो आणि खालपासून वरपर्यंत सुख कोणाच्याच वांट्यास येत नाहीं. परंतु हकदृष्टि निवळून कर्तव्यदृष्टि प्राप्त झाली कीं, असंतोषाचें वजिच नाहींसें होतें. अधिक हक्काच्या माणसाबद्दल मत्सर उत्पन्न होतो, पण अधिक कर्तव्याच्या माणसांविषयीं तितका हेवा वाट नाहीं. पण ही हक्काची बडबड बंद कधी होणार ?






३८