पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हक की कर्तव्य ?

कर्तव्य लागले आहे; त्याची जाणीव त्याला असली पाहिजे; हक्काची नको. आमच्या भाषेंत पतिधर्म, स्त्रीधर्म, राजधर्म, प्रजाधर्म, मृत्यधर्म, इत्यादि शब्द आहेत. हक्क अगर तत्सदृश शब्द कोठेंच नाहीं. राजालासुद्धां हक्क नाहीं, धर्म आहे. राजा हक्कविभूषित नसतो, तो धर्मवश असतो. राजानें आपला हक्क गाजवावयाचा नसतो. त्याला धर्माप्रमाणे वागावयाचें असतें, त्याला आपले कर्तव्य करावयाचें असतें. प्रजा आपल्या धर्माप्रमाणें वागली नाहीं तर प्रजेला धर्माप्रमाणें वागवावयास लावणें अथवा अधर्माचरणाबद्दल शासन करणें हा राजाचा हक्क नव्हे, धर्म आहे. सारांश, राजापासून रंका- पर्यंत कोणालाच हक्क नाहीत. सर्व कर्तव्यवद्ध आहेत. अशा दृष्टीने आपण आपले व्यवहार केले म्हणजे सर्वांत सात्विक गुणांचा उत्कर्ष होतो; जगांत सुखशांति नांदते; कलाहाग्नि पेटत नाहीं; उद्दामपणा अंगी येत नाहीं. म्हणून सुखप्राप्तीचा हेतु सफल व्हावा अशी इच्छा असल्यास आपल्या कर्माचा प्रेरक हक्क न मानतां कर्तव्यच मानले पाहिजे. जन्म घेणें अगर न घेणें हें आपल्या खाधीन नाहींत. तसेंच अमुकच ठिकाणीं अमुकच कुलांत अमक्याच्याच पोटीं मी जन्मास येईन असें म्हणण्याइतकें स्वातंत्र्य आपल्यामध्यें नाहीं. ह्या सर्व गोष्टी आपल्याकरतां परमेश्वर ठरवतो. तेव्हां आपणांस जन्म देण्यांत परमेश्वराचा कांहीं तरी उद्देश असलाच पाहिजे. हा उद्देश काय आहे तें समजून घेऊन तो तडीस नेणें हेंच आपले कर्तव्य होय. ह्याचा अर्थ असा कीं, कर्तव्य आपल्यामागें ईश्वराने लावून दिलें आहे व तें पार पाडणें ह्यांतच जन्माचें सार्थक आहे.
 ह्यावरून हें उघड दिसतें कीं, स्त्रियांचे हक्क ही भाषाच निरर्थक आहे. स्त्रियांनी आपल्या हक्कांबद्दल अकांडतांडव न करतां कर्तव्याची चर्चा करावी हें चांगलें. स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाहि हक्क नाहींत हैं विसरतां कामा नये. म्हणून पुरुषांप्रमाणें आम्हांला हक्क कां नाहींत हा प्रश्न असमंजस - पणानेंच विचारला जातो. तात्पर्य, पतीनें आपल्या धर्माप्रमाणें वागावें.

३७