पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हक्क की कर्तव्य ?

स्वतंत्र हक देण्याने नवरा- वायकोंत भिन्नभाव उत्पन्न होतो. पण भिन्नभावापेक्षां ऐक्यभाव प्रस्थापित करणेच हितावह आहे. हा ऐक्यभाव निर्माण करणें म्हणजे नवरावायकोंपैकी एकानें दुसऱ्यांत लीन होणें होय. आतां स्त्रीपुरुषांच्या कार्यव्याप्तीचा विचार करतां स्त्रीनेंच आपले हातपाय आंखडून घेणें राष्ट्रीय दृष्ट्या वरें. कारण स्त्री स्वभावतःच परावलंबी असून पुरुष माल निसर्गतःच स्वतंत्र आहे. म्हणून ह्या हक्कदा- नाच्या वल्गना स्त्रीपुरुषांच्या ऐक्यभावाला विघातक आहेत. जुन्या चाली तेवढ्या वाईट असल्याच पाहिजेत असें मानणें मूर्खपणाचें आहे. " पुराणमित्येव न असाधु सर्वम् ”. नेपोलिअनचेहि असेंच मत होतें. तो म्हणतो. It is ridiculous to say that nothing is right but what is new.
 असो. हल्ली ज्याच्या. त्याच्या तोंडांत हक्क हा शब्द आहे. आपल्या हकांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करण्यांत सर्व जनता गर्क झाली आहे. हें हक्कांचें वेडें पीक पश्चिमेकडून पूर्वेस आले आहे. अवी- चीन संस्कृतीचा तो एक आधारस्तंभ आहे. सुखावाप्ति हा प्रत्येक क्रियेचा हेतु असतो. आपल्या हक्कांचे उल्लंघन दुसऱ्याला न करूं देण्यानें व दुसऱ्याच्या हक्कांची पायमल्ली आपण न केल्यानें एकंदर जनता सुखी होईल असा आधुनिक पंडितांचा सिद्धांत आहे. पण इतर सिद्धांताप्रमाणें हाहि चुकीचा ठरेल ह्यांत संदेह नाहीं. अनुभवहि तसाच येऊं लागला आहे. हक ह्या शब्दांत उन्माद उत्पन्न करण्याचें सामर्थ्य असल्यामुळे अलीकडे सर्वच लोक उन्मत्त म्हणजे रजोगुणी दिसतात. सात्विक गुण सध्यां समाजांत लुप्तप्राय झाला आहे. लोकशाहीच्या युगांत हा विपर्यस्त

३५