पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गृहणी गृहमुच्यते.

 संतानोत्पादनाकरितांच स्त्रीचा जन्म असल्यामुळे गृह हेंच काय तें तिचें कार्यक्षेत्र बनणें स्वाभाविक आहे. गृह आणि स्त्री ह्यांचें इतके तादात्म्य आहे कीं, " गृहिणी गृहमुच्यते " ह्या उक्तीची यथार्थता कोणाहि विचारवंताला पटल्यावांचून राहणार नाहीं. घरीं स्त्री आणि बाहेर पुरुष ही योजना जणूं काय निसर्गसिद्धच दिसते; व अशा ह्या विभागणीनें स्त्रीला कोणत्याहि प्रकारचा कमीपणा वाटण्याचें कारण नाहीं. उलट गृहिणी ह्या बहुमानपूर्ण पदाची प्राप्ति करून घेण्याची तिला महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. राज्यव्यवस्था व गृहव्यवस्था ह्यांमध्ये स्वरूपतः कांहीं भेद नाहीं; म्हणून राज्यव्यवस्थेच्या कामी जें चातुर्य, जी दक्षता, व जो चतुरस्रपणा लागतो त्या सर्व गुणांची गृहव्यवस्थेच्या कामींहि आवश्य- कता असते. ह्याकरितां हे गुण ज्या शिक्षणाच्या योगानें स्त्रियांत अवत- रतील असें शिक्षण त्यांस मिळाले पाहिजे. विवाहित स्त्रियांनीं द्रव्यार्जन केलें असतां त्यांची नवऱ्याजवळ प्रतिष्ठा राहील व त्यांना ओशाळगतीनें वागण्याचे प्रयोजन राहणार नाहीं, ही मिलची विचारसरणी हास्यास्पद व मूर्खपणाची आहे. मिलचे विचार उथळ असून त्याच्या लेखांचा परि- णाम आमच्याकडे गेल्या पिढीवर झाल्यामुळे आमच्याहातून आमच्या राष्ट्राचें अनहित होत आहे. नवराबायकोचा अथवा पतिपत्नीचा समस- मान दर्जा आणि अधिकार पाहिजे, दोघांना सारखे हक्क पाहिजेत, त्याशिवाय या स्त्रीपुरुषांचा संसार सुखावह होणार नाहीं, ह्या मताचा पुर- स्कार कांहीं पाश्चात्य पंडितांनीं केला व तेंच तुणतुणें आम्हीं पण वाज- वीत बसलों आहों. पण हा माभळभट्टी युक्तिवाद कोणाचें समाधान करूं शकेल ? समान हक्काच्या वायफळ गोष्टी बोलणारांना आपण काय म्हणतों हे तरी समजतें कां ? नवऱ्याविरुद्ध स्त्रीचा हक्क ! स्त्रीविरुद्ध नव- ऱ्याचा हक्क ! असे हक्क असले म्हणजे त्यांचे अतिक्रमण हरघडी होणार. कारण नवराबायकोचा परस्परसंबंधच तशा प्रकारचा आहे आणि मग

३३