पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न स्त्री स्वातंत्र्यमर्हति .

ह्या गोष्टी रुचत नाहींशा झाल्या आहेत. म्हणून त्यांचे उन्नतीचे मार्गह निराळेच. “नवाङ्गनानां नव एव पन्थाः " प्रजननाच्या कामी पुरुषांची जरी आवश्यकता असली तरी तो तें कर्म करून कोणताहि धंदा करण्यास मोकळा असतो. म्हणजे पुरुषाचें स्वयंभू स्वातंत्र्य निर्बाधित राहतें. परंतु स्त्रिया मात्र स्वयंभूच परावलंबी असतात. कारण गर्भधारणा म्हणजे परावलंबन होय. आतां स्त्रियांना स्वातंत्र्य नाहीं ह्याचा अर्थ त्यांना प्रत्यक्ष कृतींत गुलामाप्रमाणे वागवाव्या, त्यांना हाणमार करावी, अगर त्यांची आबाळ करावी, असा होत नाहीं. ज्या मनूनें स्त्रीला स्वतं- त्रता युक्त नव्हे असें लिहिलें त्याच मनूनें जेथें स्त्रिया पूज्य मानल्या जातात तेथेंच देवता सुख पावतात असें लिहिलें आहे, त्यांत कोणतीहि विसंगति नाहीं. तात्विक दृष्टया स्त्रियांची परवशता मान्य करून स्त्रियांना जितके खातंत्र्य देतां येईल तितकें देणें हें आपले कर्तव्य आहे असा मनूचा आशय. पण स्त्रिया जर स्वभावतःच परवश आहेत, स्त्रीत्वाला अनुरूप असें परमेश्वरनियोजित कार्य पार पाडण्याकरतां परावलंबित्व पतकरणें जर त्यांचें मुख्य कर्तव्य आहे, तर एकाच पतीवर आजन्म विसंबून राहणें हेंच योग्य ठरत नाहीं काय ? पण ह्या मुद्याचा विस्तार पुढें करतां येईल. सध्यां स्त्रीची सहजपंगुता निदर्शनास आणणें हेंच आपले काम आहे.