पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

गृहस्थाचे आद्य कर्तव्य आहे. आणि स्त्री ही संततिनिर्मितीचे साधन आहे. तथापि स्त्रियांचा हा आयुष्याचा काळ परावलंबनांत जातो हि सूर्यप्रकाशाइतकेंच स्पष्ट आहे. असें असतां स्त्रीपुरुषांना एकाच दावणीत गोवून पुरुषांप्रमाणेच स्त्रिया खवश आहेत अशी अयथार्थ कल्पना करून पुरुषी धंदे करण्यास स्त्रियांना सवलत देणें हें पोरकटपणाचें व उल्लूपणाचे द्योतक नाहीं काय ? मनु हा मोठा समाजशास्त्रज्ञ होता. स्त्रियांना स्वातंत्र्य देणें राष्ट्रीयदृष्टया हितावह नाहीं हा त्याचा सिद्धांत आधुनिक उसन्या विचारांच्या पावशिक्षितांना मानवत नाहीं ह्यांत त्या महानुभावाचा काय दोष? स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे वंशक्षय; आणि वंशक्षय म्हणजे राष्ट्रक्षय. प्रजोत्पादनकालीं स्त्रियांना कोणताहि व्यवसाय स्वतंत्रपणे करतां येत नाहीं हें आपण पाहिलेच आहे. तेव्हां अर्थातच स्त्रीस्वातंत्र्य आणि प्रजोत्पादन यांचें साहचर्य असणें शक्य नाहीं. पुरुषव्यापार करणाऱ्या स्त्रिया प्रजोत्पादनपराङ्मुख असतात असा अनुभवहि आहे. म्हणून पुरुषांचे धंहे स्त्रिया करूं लागल्या की राष्ट्र खड्डयांत गेलेंच म्हणून समजावें. “स्त्री पुंवच्च प्रभवति यदा तद्धि राष्ट्रं विनष्टम् " हें कांहीं खोटें नाहीं. स्वतंत्र धंदे करून आपली उपजीविका करूं पाहणाऱ्या स्त्रिया अविवाहित राहतील अथवा संतति न होण्याच्या मार्गाचा अवलंब करतील. ह्याचा परिणाम राष्ट्रावर काय घडेल हें आपणांस आज फ्रान्सच्या उदाहरणावरून समजण्यासारखे आहे. स्त्रीपुरुषांना एकत्र स्नान करतां येईल अशीं सार्वजनिक स्नानगृहें उघडावी अशा सूचना प्रजन- नाच्या उत्तेजनार्थ आज फ्रान्समध्ये मोठ्या विद्वानांकडून होत आहेत. स्त्रियांना स्वतंत्र धंदे करूं देणें म्हणजे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणें होय व त्याचाच अर्थ विवाहसंस्था नष्ट करणें होय.
 विवाहसंस्थेबरोबर कुटुंबसंस्थाहि लुप्त होणार. ह्यासाठींच मनूनें स्त्रियांना स्वातंत्र्य देऊं नये असें म्हटलें आहे. पण हल्लींच्या बायकांना

३०