पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न स्त्री स्वातंत्र्यमर्हति.

कांहींहि असो, पुरुषापेक्षां स्त्रीचें शरीरसामर्थ्य कमी असतें ही गोष्ट खरी. क्षणभर अशीहि कल्पना करूं कीं, स्त्री व पुरुष हीं शरीरसाम- र्थ्याच्या बाबतीत समबल आहेत. तथापि गर्भावस्थेत व प्रसूतिसमयी स्त्रिया परवश होतात ह्याविषयी शंका येण्याचें कारण नाहीं. स्त्रियांच्या आयुष्यांतील हा पंगुपणाचा काल थोडाथोडका असतो असेंहि नाहीं. अशा वेळी संरक्षणार्थ स्त्रिया अन्यगतिक बनतात ह्यांत आश्चर्य तें काय ? रोगग्रस्त पुरुषहि हतबल होऊन परतंत्र होतो, अशा विचारानें वरील प्रमेय बाधित होत नाहीं. व्याधिजन्य पराधीनता स्त्री-पुरुषांस सारखीच आहे. शिवाय व्याधिपीडा ही आगंतुक असते. ती प्रकृति नव्हे. ती विकृतावस्था होय. पण गर्भावस्था हा स्त्रीत्वाचा नैसर्गिक परिणाम आहे.. प्रजोत्पादन व प्रजासंगोपन ह्यांकरितांच स्त्रीचा जन्म आहे. तेव्हां स्त्रीची परवशता स्वभावसिद्ध आहे, हेंच सिद्ध होतें. नऊ महिने गर्भधारणा व व तीन महिने प्रसूतावस्था ह्याप्रमाणे एक वर्ष दर बाळंतपणामागें स्त्रिया नियंत्रणाखालीं असतात. ह्या कालांत कोणताहि व्यवहार आणि तोहि अप्रतिहतपर्णे करतां येईल इतका त्यांच्यामध्ये शरीराचा सुटसुटीत- पणा अगर मनाचा चलाखपणा असू शकत नाहीं. एवढेच नव्हे तर अन्य व्यवसायांत लक्ष्य घातल्यास त्याचा अनिष्ट परिणाम गर्भपोषण- क्रियेवर झाल्यावांचून राहात नाहीं. त्याचप्रमाणे प्रसूतीनंतर शिशुपानाचें कामहि एकट्या स्त्रियांवरच पडतें व हाहि कालावधि एका वर्षाहून कमी नसतो. ह्या कालमर्यादेतहि स्त्रीच्या हातून कोणताहि स्वतंत्र व्यवसाय होण्यासारखा नसतो. सारांश, एका मुलाच्या मागें स्त्रीची दोन वर्षे. जातात व दोन वर्षांनीं पुनः गर्भधारणेचा प्रसंग येतो. तेव्हां वयाच्या सोळा वर्षांपासून सुमारें पंचेचाळीस वर्षेपर्यंत स्त्रियांचे आयुष्य मुलांच्या पायीं खर्च होतें. पण ह्यांत कांहीं अयोग्य आहे हें ध्वनित करणेंहि मूर्ख -- पणाचें होईल. कारण अभिजात संतति निर्माण करणें हें प्रत्येक देशप्रेमी,

२९