पान:गच्चीवरील गप्पा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति.

स्त्रियांना अबला ही दिलेली संज्ञा सार्थ आहे. नुसत्या शरीररचनेचा विचार केला तरी सुद्धां असें दिसून येईल कीं, स्त्रियांचे शरीर कोमल तर पुरुषांचें राठ; पुरुषांप्रमाणें स्त्रिया कणखर क्वचित असतात. हा भेद मनुष्यांतच असतो असें नव्हे. पशुपक्ष्यांतहि हीच स्थिति अनुभवास येते. मनुष्यांत कृत्रिम बंधनांमुळे पुरुषांप्रमाणे स्त्रियांची वाढ होत नाहीं असें म्हणतां येण्यासारखें आहे. पण पशुपक्ष्यांत तर पूर्ण स्वातंत्र्य आहेना ? मग तेथें ह्या भेदाची उपपत्ति कशी लावणार ? वैल व रेडा हे जितकें ओझें बाहूं शकतील तितकें गाय व म्हैस ह्यांना सहन होत नाहीं; म्हणू- नच गाडीला गाय अगर म्हैस कोणी जुंपीत नाहीं. वरें एखाद्या बुद्धिवाद्या तार्किकानें असा प्रयोग करून पाहिला तर त्यास काय अनुभव येईल ? गाय व म्हैस ह्यांच्याकडून कमी काम होईल व शिवाय दोहनकर्माला त्या अपात्र होतील. म्हणजे एकंदर दुहेरी नुकसान होईल. गायीला बैली धंदा करावयाला लावून गायीमधला गायपणा आपण नाहींसा करतों, आणि मिळवतों काय ? कांहीं नाहीं. अशी कल्पना करा की, जगांतील सर्व गायह्मशींना आपण बैलरेड्यांच्या ऐवजी उपयोगांत आणले. आतां ह्या सुधारणेनें जगाचें कल्याण होईल, असें गुळमुळीत तरी म्हणावयास कोणी धजावेल काय ? जी गोष्ट गायी म्हशींची तीच मानुषस्त्रियांची. पुरुष जातीपेक्षां स्त्रीजात शरीरानें निसर्गतःच निर्बल असते ह्यांत संशय नाहीं. ह्याचें एक कारण असें आहे कीं, स्त्रियांपेक्षां पुरुषांत कामोद्भव उत्कट असतो. पुरुषांत कामाची तडफ स्त्रीपेक्षां अधिक व्यक्त असते. त्यामुळें पुरुषांची सर्व इंद्रियें व अवयव ह्यांचें विकसन जास्त होतें. कारण

२८