पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुटुंबसंस्था मरेल कां तरेल ?

इच्छा मनांत धरूनच मनुष्यांमध्ये स्त्रीपुरुष संयोग होत असतो; निदान तसा होणे अत्यंत अगत्याचें आहे. कारण हा व्यक्तीचा प्रश्न नसून राष्ट्राचा आहे. मनुष्यांचें राष्ट्र बनते, जनावरांचें बनत नाहीं. दुसऱ्या राष्ट्रानें आपणांस खाऊं नये असे वाटत असल्यास पशुकोींतून मनुष्य- कोटींत आपणांस आलेच पाहिजे. नुसत्या विषयानंदाकरतां स्त्रीपुरुष- संयोग होण्यानें मनुष्यत्वाची हानि होते. जनावरांमध्ये आणि मनुष्यां- मध्ये कांहीं भेद रहात नाहीं. अपत्यप्रेम हेंच स्त्रीपुरुषांस एकत्र ठेवूं शकतें. “ अंतःकरणतत्त्वस्य दंपत्योः स्नेहसंश्रयात् । आनंदग्रंथिरेकोऽय- मपत्यमिति बध्यते " ॥







२७