पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

म्हणावें लागतें. पण मग विषयसुखाहून भिन्न असें जें कौटुंबिक सुख त्याविषयीं पुरुषांपेक्षां स्त्रिया स्वभावतःच कमी उत्सुक असतात कीं काय ? स्त्रीखातंत्र्य व कुटुंबसंस्था ह्यांचें साहचर्य संभवतें काय ? हा समाजा- पुढें सध्यां प्रश्न आहे. त्याचप्रमाणे कुटुंबसंस्था मोडली तर मुलांचें संगो- पन करून त्यांना उत्तम नागरिक बनवण्याची जबाबदारी सरकारला झेपेल काय, हाहि दुसरा प्रश्न त्यानंतर उद्भवलाच पाहिजे. आपलें राष्ट्र परांकित होऊं नये, आपल्यालाच उच्च संस्कृति लाभावी, परमेश्वरानें आपणांस जन्म दिल्याचें सार्थक व्हावें, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या राष्ट्रानें शरीरानें सुदृढ, मनानें निष्पाप, आणि बुद्धीनें चौकस अशी प्रजा ज्या योगानें निर्माण होईल अशाच संस्था अस्तित्वांत आणल्या पाहिजेत. कुटुंबसंस्था विलयाला गेली तरी सुद्धां अशी संतति जन्मास येईल अशी हमी देण्यास कोणी तयार आहे काय ? इतर प्राण्यांहून मनुष्याची गोष्ट निराळी आहे. इतर प्राण्यांत नरमादीचा संयोग केवळ आत्मतृप्तीकरतां असतो. पुढें प्रजा कशी होईल ह्याची कल्पना त्यांना कधींच शिवत नाहीं, व मनुष्येतर जीवसृष्टीत जसा एक प्राणी तसाच दुसरा अशी स्थिति असते. परंतु मनुष्यांत मन आणि बुद्धि हीं श्रेष्ठ प्रतीचीं असल्यामुळे एक मनुष्य दुसऱ्या माणसासारखा नसतो. कधीं कधीं दोन माणसांत जमीनअस्मानाचें अंतर असतें. गांधी आणि जवळकर ह्या दोन माणसांत शरीरसादृश्याशिवाय कांहीं तरी साम्य आहे काय ? आतां गांधीसारखी नररत्नें आपल्या कुलांत निपजावी अशी प्रत्येक आईबापाची उत्कट इच्छा असली पाहिजे. तेव्हां भावी संततीविषयीं विचार न करतां स्त्री- समागम करणें म्हणजे पाशवी वृत्तीचा अंगीकार करणें होय. ही आपत्ति टाळण्याकरितांच विवाह व कुटुंबसंस्था अस्तित्वांत आल्या. ' ददातु वीर शतदायमुक्थ्यम्' (अथर्ववेद ६१४९ ) - संपन्न, विख्यात आणि परा- क्रमी असा पुत्र देवो - अशी परमेश्वराची प्रार्थना करून व अशी प्रवल

२६