पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुटुंबसंस्था मरेल कां तरेल ?

-मात्र प्रामुख्यानें दिसतात. गुणांकडे दुर्लक्ष्य होतें. ह्यानंतर, औदासीन्य, असंतोष, व विरोध ह्या गोष्टी क्रमप्राप्तच होतात. अखेरीस विवाहग्रंथि छेदून टाकून असंतोषाचें शिखर गांठलें जातें. हा प्रकार ज्या राष्ट्रांत प्रेमजन्य विवाह होतात त्यांत घडून येतो हे विसरता कामा नये. आमच्या जुन्या विवाहकल्पनेंत आणि आधुनिक पाश्चात्य विवाहकल्पनेंत मोठा फरक आहे हें येथें ओघाने आल्यावरून नमूद करणें जरूर आहे. हल प्रेम हैं विवाहाचें कारण आहे. एकमेकांवर प्रेम असेल तरच विवाह करावा, अन्यथा केला असतां तो अशुद्ध विवाह होय, अशी सध्यां सुशि- क्षितांची समजूत झालेली आहे. पण आमच्यामध्यें प्रेम हें विवाहाचें कार्य आहे, कारण नाहीं. विवाहानें आपण एकमेकांशी बद्ध झालों आहों, - ह्यामुळे एकमेकांवर प्रेम करणें आपले कर्तव्य आहे, तो आपला धर्म आहे, असें आम्ही मानतों. परंतु अलीकडे प्रेमाला कार्याच्या ऐवजीं • कारण बनविण्याची धडपड चालू आहे. सारांश स्त्रीसंबंधाचा प्रश्न समाज- शास्त्राचें अध्ययन करणाराला अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच विकट आहे. शिक्षणाबरोबर विचारस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याबरोबर अभिमान, व्यक्त्यभिमानाबरोबर दुसऱ्याविषयीं पूज्यबुद्धीचा अभाव, अशी ही परं- परा आहे. ह्याचा परिणाम कौटुंबिक सुखाचा अभाव. स्त्रीपुरुषांत दुसरा एक भेद आहे तोहि विचारांत घेण्यासारखा आहे. आर्थिक स्वातंत्र्यानें स्त्रियांमध्यें विवाहपराङ्मुखता बळावते असा अनुभव आहे. पण पुरुषा- मध्ये मात्र धनसंचय हा विवाहप्रवणतेला कारणीभूत होतो. ह्याचा 'उघड अर्थ असा दिसतो कीं, श्रीमंतीच्या उपभोगाची पूर्तता होण्यास पुरुषाला स्त्रीची आवश्यकता वाटते. पण एवढेच असतें तर पुरुष, विवा- हाच्या भानगडीत पडताना. विवाहव्यतिरिक्त मार्गानें त्याला विषय- सेवन करतां आलें असतें. परंतु ज्याअर्थी तो लग्नाची घोरपड आप- खुषीनें पतकरतो त्याअर्थी तो कुटुंबसुखाची लालसा धरून असतो असें

२५