पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

अशा प्रकाराने कुटुंबसंस्था अर्थातच नष्ट होणार. आतां एवढें खरें कीं, स्त्रियांनी पुरुषी धंदे करण्यास नुकताच उपक्रम केला असल्यामुळे हो -आपत्ति ओढण्यास थोडा कालावधि लागेल. तथापि सुशिक्षित स्त्रीपुरु- 'पांची वैवाहिक ग्रंथि आजन्म अभेद्य ठेवणें दुःसह होईल. दोन पुरुष अथवा दोन स्त्रिया आयुष्यभर सुखासमाधानानें एकत्र राहिल्याचें उदा- हरण क्वचित् सांपडेल. तोच प्रकार स्त्रीपुरुषांच्या संबंधानेंहि होणार व मग सांप्रत शब्दांत प्रचलित असलेल्या काडीमोडींचा प्रघात सरसहा सुरूं होणार. हा नुसत्या कल्पनेचा खेळ नव्हे, फक्त कालाचा प्रश्न आहे. अल्पकालीन संबंधापासून झालेल्या प्रजेची काळजी सरकारास घ्यावी लागेल. मुलें आईबापांची नसून सरकारची होतील व त्यामुळे सर्व समाज- घटनाच बदलेल. मुलें सरकारला पोसावीं लागलों कीं, सर्व इस्टेट ही वारसादाखल सरकाराकडेच गेली पाहिजे. राष्ट्राचा घटक कुटुंबाच्या ऐवजी व्यक्ति होईल. पण सरकारकडून सर्व मुलांची योग्य जोपासना कशी व्हावी ? त्यांस योग्य शिक्षण कसें मिळावें ? प्रजासत्ताक राज्यकार- भार असल्यास ह्या मोष्टी कशावशा तरी पार पडतील, निदान सुप्रजा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न तरी केले जातील. पण एकसत्तात्मक राज्य- व्यवस्थेत त्या पद्धतीला पोषक असेच गुण मुलांमुलींत येतील अशी खबरदारी घेण्यांत येईल. असें राष्ट्र हीनतेज होण्यास विलंब किती लाग- णार ? ह्याप्रमाणें स्त्रियांचें पुंसीभवन म्हणजे समाजाची अधोगति होय. अमेरिकेंत काडीमोडीचें प्रमाण फारच मोठें आहे. युरोप खंडांतहि कांहीं कमी नाहीं. अगदी ताजे उदाहरण म्हणजे केमलपाशाचें. सुशिक्षित स्त्रीबरोबर प्रेमविवाह होऊन थोडे दिवस गेले नाहींत तोंच उभयतांना परस्परांचा वीट आला. एका म्यानांत दोन सुन्य राहात नाहींत. लग्ना- नंतर स्त्रीपुरुषांचा मिलाफ होण्याच्या ऐवजी थोडक्याच दिवसांत हळु- हळू खिंडारें पडण्यास सुरवात होते. निकटसांनिध्यानें एकमेकांचें दोष

२४