पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुटुंबसंस्था मरेल कां तरेल ?

स्त्रियांच्या पुंसीभवनाचा उद्भव व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेंत झाला आहे हे उघड आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा फैलाव सार्व- त्रिक शिक्षणाच्या प्रसारावरोवर होणें अपरिहार्य आहे. आतां शिक्षणाचा संकोच करणें कोणासहि इष्ट वाटत असले तरी तें अतः पर अशक्य, अव्यवहार्य व सर्वथैव असंमत असेंच होणार. पुरुष सुशिक्षित असण्याची आवश्यकता कोणासच अमान्य करतां येणें शक्य नाहीं, आणि सुशिक्षित भार्या असावी असे वाटणें ह्यांतहि कांहीं अस्वाभाविक आहे असें म्हणतां येणार नाहीं. परंतु दोन तुल्य-पदस्थ पण भिन्न रुचीचीं, भिन्न प्रकृतीचीं व भिन्न स्वभावाचीं माणसें आमरण सुखासमा- धानानें एकल नांदणें शक्य आहे काय ? शिक्षणानें रुचिवैचित्र्य, मत- वैचित्र्य, स्वभाववैचित्र्य ह्यांचे वाढते प्रमाण असतें. दोन सुशिक्षित माण- सांत एखाद्या विषयासंबंधानें मतभेद झाला तर एकाचें संमीलन दुस- -यांत कसें व्हावें ? वरें एकाच मताच्या स्त्रीपुरुषांचा संबंध घडला तरी स्वभाव जुळणें ही कांहीं सोपी गोष्ट नाहीं. न जुळत्या स्वभावाच्या दोन माणसांनीं जन्मभर एकत्र कां म्हणून राहावें हा विचार शिक्षणामृत-- [ ? ] पान केलेल्या स्त्री-पुरुषांच्या मनांत घोळल्यावांचून राहणार नाहीं. तेव्हां असुखकर असें वैवाहिक संबंध भराभर तोडून आपल्या नशि- बाची पारख इतरत्र पाहण्याकडे स्त्री-पुरुषांची प्रवृत्ति होणार. पुरुष धंदे करूं पाहणाऱ्या स्त्रिया विवाहशंखली पत्तकरपयासां तयार होणार नाहींत. परंतु पुष्पधन्व्याच्या शरताना लाचार होऊन पुरुषाबरोबर अवैवाहिक संबंध करून त्यांना आपली विषयतृप्ति करून घ्यावी लागेल.