पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



गच्चीवरील गप्पा.

आज हिंदुस्थानांत स्त्रिया ज्या तऱ्हेनें वागतात अगर त्यांस ज्या तऱ्हेनें वागविलें जातें तशीच हुबेहुब ग्रीक स्त्रियांचीहि वागणूक असे. कुमारी- विवाह प्रचारांत असून गृहव्यवस्था हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असे. घराच्या बाहेर पडणें त्यांस फारसें माहीत नव्हतें, घरांतहि स्त्रियांच्या व पुरुषांच्या बैठकी बेळवेगळ्या असत. नवयाच्या परोक्ष परपुरुषाशीं संभाषण करणें म्हणजे त्यांस मोठा अनाचार वाटत असे. पुरुष पाहुणा असला तर त्या पंक्तींत भोजनास वसत नसत. पतिनिष्ठा हा त्यांच्या समजुतीनें मोठा सद्गुण असे. ख्रिस्ती राष्ट्रांतील स्त्रियांनीहि थोड्या वर्षां- पूर्वीपर्यंत आपल्या स्त्रीत्वाचा त्याग केला नव्हता व अद्यापहि फ्रान्स व जर्मनीतील स्त्रियांनीं पुंसीभवनाचा " मार्ग फारसा आक्रमला नाहीं. व्हिक्टोरिया राणीलाहि आपल्या सिंहासनाची मनापासून चि वाटे. हे पुरुषी धंदे बायकांना युक्त नाहींत असें तिचें मत होतें. "I am every day more convinced that we women, if we are good women, feminine, amiable and do- mestic are not fitted to reign......We women are not fit for governing and if we are good women we must dislike these masculine occupations."

(Letters, Vol II )

ख्रिस्ती लग्नविधींत मी पतिपरायण राहीन अशीच शपथ वधूला घ्यावी लागते. पण अलीकडे कांहीं ख्रिस्ती राष्ट्रांनी मी पतीच्या अर्ध्या वचनांत राहीन अशा तऱ्हेची नवऱ्याची ताबेदारी पतकरावयास लावणारी शपथ काढून टाकून तिच्या ऐवजी तोलास तोल देण्यास लावणारी शब्दयोजना करून नवीन शपथ ( ? ) बनवली आहे. सारांश, 'कोणाची होऊं नये बायको' ही जुनी म्हण अमलांत आणण्याचा विडा सध्यां स्त्रियांनीं उच- लला आहे. स्त्रिया म्हणजे काव्य, मग कवींप्रमाणे स्त्रियाहि निरंकुश अस- ण्यांत चुकलें कोठें ?


२२