पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रियांचें पुंसीकरण.

पतीमध्येंच पत्नीनें लीन कां म्हणून व्हावें ? पत्नीमध्येंच पतीनें जिरून - जाण्यास प्रत्यवाय कां असावा ? विवाहानंतर तिचें नांव बदलण्याची वहि- वाट काय म्हणून ? अशा ह्या विचाराच्या भोवऱ्यांत आधुनिक स्त्रिया सांपडल्या आहेत. आमच्याकडेहि इंग्रजी शिक्षणावरोबर ह्या विचारांचा फैलाव अधिकाधिक होणार ह्यांत शंका नाहीं.
 आमच्यापैकी एकजण “ सर्वसत्वरुतज्ञ " म्हणजे सर्व जीवांची भाषा जाणणारा होता. त्यानें ही विद्या एका पिशाच्च्यापासून संपादन केली होती. गाईंबैलांमधला संवाद त्यानें ऐकला होता, तो ह्यावेळीं त्यानें आम्हांस आपल्या विनोदी भाषेत कथन केला. गाय बैलाला म्हणते कीं, तुम्हां बैलांनाच नांगराला, गाडीला जुंपण्यांत येतें तें काय म्हणून ? आम्ही असें कोणतें पाप केलें आहे कीं, आमचा उपयोग ह्या कामांकडे लोकांनी करूं नये ? बैलानें उत्तर दिलें कीं, माझीहि तक्रार तीच आहे. तुम्हां गाईंचीच पूजा लोक का करतात ? कामधेनु म्हणून तुमचाच बहुमान कां करतात ? लोकांची पायेवासना तुम्हांलाच भागवितां कां यावी ? आमच्यामध्येंच तें सामर्थ्य कां नसावें ? वगैरे. ह्या संवादांत प्रस्तुत स्त्रीपुरुषवादाचे रहस्य प्रतिबिंबित झालें आहे, हें कोणालाहि दिसून येईल.
 आजपर्यंत सर्व राष्ट्रांत स्त्रिया अबला असें समजून त्यांच्या संरक्ष- 'णाची जबाबदारी आपणावर आहे अशा समजुतीनें स्त्रियांची वागणूक उरली गेली होती. पण अबला म्हणून घेण्याचें स्त्रियांस आतां लांछनास्पद वाटू लागले आहे. सर्व देशांतील मध्ययुगीन समाजघटना, स्त्रीपुरु- `षाचा लिंगभेदजानेत नैसर्गिक स्नेहाकर्षणधर्म व पुरुषांच्या मानानें स्त्रियांचा नैसर्गिक दुबळेपणा ह्या दोन तत्त्वांवर उभारली होती. म्हणून स्त्रीपुरुषांच्या प्रकृतिधर्माप्रमाणे त्यांचे भिन्न व्यवसाय ठरले गेले. - त्याचप्रमाणे स्त्रीपुरुषांचा मिश्र समाज हा अशिष्टाचार मानला गेला !

२१