पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४ गृहप्रवेशनीय होम अपरिहार्य नाहीं.

कडून सीमंतपूजन व मांडवपरतण घेणाऱ्या शिक्षितांच्या बेवकूबतेची तारीफ करावी तेवढी थोडीच. हा नुसतां प्रतिष्ठित लुटारूपणा होय. कन्यादानानिमित्त कन्येचा बाप आप्तेष्टांना पानसुपारी देतो हें ठीक आहे. पण मुलाच्या बापाकडूनहि मुलीच्या मांडवांत पानसुपारी वांटण्याचा व अत्तरगुलाब देण्याचा प्रचार कां पाडावा तें समजत नाहीं. मुलाच्या बापाचा अज्ञानजन्य अहंभाव हेंच कारण असावें दुसरें काय ?
 लग्नाच्या बाबतींत पुष्कळच सुधारणा करणे इष्ट आहे. प्रथम प्राचीन- काळची कन्यावरणाची चाल अस्तित्वांत आणावी. ऋतुप्राप्तीपूर्वी विवाह झालाच पाहिजे असा नियम असल्यामुळे मुलीच्या लग्नाची घाई कर- ण्याचें कारण पडलें. पण ही मर्यादा अतउत्तर राहिली नाहीं. तेव्हां मुलीच्या बापाला तिच्या लग्नाचें एवढें चिंतन कशाकरतां ? म्हणून मुलाच्या बापाने मुलीकरितां मागणी करावी म्हणजे मुलींची प्रवासाची दगदग वांचेल, तसेंच लग्नसमारंभ मुलीच्या गांवींच व्हावा. हुंडा न घेतांना सालंकृत कन्यादान व्हावें. कन्यादान, विवाहहोम आणि गृहप्र- वेश ह्याव्यतिरिक्त कोणताहि विधि करूं नये. जेवणावळी फक्त दोन व्हाव्याः एक वधूकडील व एक वराकडील असें केलें असतां ' कन्या- पितृत्वं खलु नाम कष्टम् ” असे शोकाकुल उद्गार मुखावाटे काढण्याचा प्रसंग कोणावरहि ओढवणार नाहीं.






१९