पान:गच्चीवरील गप्पा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गच्चीवरील गप्पा.

परंतु इतकें करणेंहि दुर्घट वाटत असेल व अग्निसेवेचा पुनरुद्धार कर- ण्याचें जर समाजाला पटत नसेल तर गृहप्रवेशनीय होम तरी करण्याचें कारण काय ? विवाहहोमानें विवाहकार्य होतें. “ भार्यात्वसिद्धये विवाह- होमं करिष्ये " इतकाच संकल्प सोडावा. "गृह्याग्निसिद्धये च " हे शब्द उच्चारूच नयेत. म्हणजे गृहप्रवेशनीय होमाचा प्रश्नच उरत नाहीं; आणि आपल्या बेअकलीपणाचें प्रदर्शनहि होणार नाहीं. गृह्यसूत्रांत “ विवाहाग्निमग्रतोऽजस्रं नयन्ति ” असें सांगितलें आहे. हा विधि नाहीं. केवळ पूर्वापार रूढि निवेदन केली आहे. विवाहानि नेहमी पुढे नेतात हा ह्या सूत्राचा अर्थ आहे. विवाहानि न्यावा असें सूत्रकार सांगत नाहीं. म्हणून " इह प्रियं प्रजया ते समृध्यताम् " असें म्हणून गृहप्रवेश करावा. तात्पर्य गृह्यानीचें पुनरुत्थापन करावयाचें असेल तरच विवाहाग्नि गृह- प्रवेशाच्या वेळी न्यावा. गृह्याग्निसिद्धि हैं कांहीं विवाहांगभूत कर्म नव्हे. विवाहानंतर गृह्याग्नि सिद्ध करण्यास अधिकार प्राप्त होतो इतकेंच. त्या दोहोंमध्यें अवयवावयविभाव नाहीं, कार्यकारणभाव आहे, हें विसरतां कामा नये. सारांश कन्यादान, विवाहहोम आणि गृहप्रवेश ह्रीं विवाहाचीं प्रमुख अंगें होत. गृहप्रवेशाबरोबर लग्नविधि संपूर्ण होतो.
 वरील विवेचनावरून आपोआपच सिद्ध होतें कीं, लग्नांतील बाकीचे असंख्य विधि अनावश्यक होत. ग्रहमख, देवप्रतिष्ठा, सीमंतपूजन, वाङ्- निश्चय, मधुपर्क, पुण्याहवाचन, ऐरणीदान, ऐरणीपूजन, प्रारंभींचें पत्रि- कापूजन वगैरे विधि वैकल्पिक आहेत. ज्यांना वेळ असेल, हौस असेल, त्यांनीं हे विधि करावे. बाकीच्यांनी त्यांना संक्षेप द्यावा हेंच उत्तम. घाणा, उष्टी हळद, रुखवत, मांडवपरतण, अंबोण इत्यादि आचार तर सध्यां निरर्थक भासतात, एवढेच नव्हे तर आमच्या बुद्धिमांद्याची ती एक ध्वजाच आहे, असें म्हटलें असतां यत्किंचितहि अतिशयोक्ति नाहीं. मुलीच्या बापाला आपल्या गांवीं खेचून आणून परत त्याच्या-

१८