पान:गच्चीवरील गप्पा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४ गृहप्रवेशनीय होम अपरिहार्य नाहीं.

विवाहहोमानंतर गृहप्रवेशनीय होम हें फार महत्त्वाचें कृत्य आहे.... "गृह्यानि सिद्ध करण्याकरतां मी विवाहहोम करतों' असा संकल्प केल्यावर गृहप्रवेशनीय होम अवश्य केलाच पाहिजे. कारण विवाहानीवरच तो होम करावयाचा असून त्याच्याशिवाय गृह्यत्वासिद्धि होत नाही. परंतु गृहप्रवेशनीय होम हा वरघरी करावयाचा असून सांप्रत वधूच्या घरीच केला जातो हे आमच्या विचारशून्यतेचें द्योतक होय. ज्यांना विचार- पूर्वक कर्मे करण्याची इच्छा असेल त्यांनी ही गैरशिस्त चाल प्रथम सुधारावी. किंजवडेकर व गोरे शास्त्री यांनी ह्या मूर्खपणाच्या आचाराचा तीव्र निषेध केला आहे तो अगदी योग्य आहे. गृहप्रवेशानंतर लक्ष्मी- पूजनादि बंडे काढून टाकून त्यांच्या ऐवजी गृहप्रवेशनीय होम करावा. गृहस्थानें स्मार्ताग्नि बाळगावा हैं युक्त होय. हा नष्ट झालेला आचार पुनः सुरू करावा. त्यामध्यें दौष्कर्य नाहीं. कालक्षेपहि विशेष नाहीं. उलट स्त्रियांस धर्माचरण करण्याची सुसंधि मिळते. " पाणिग्रहणादि गृह्यं परि-- चरेत्स्वयं पत्न्यपि वा पुत्रः कुमार्यन्तेवासी वा " पाणिग्रहणापासून स्वतः, पत्नीनें, मुलानें, मुलीनें अथवा शिष्यानें अभिसेवा करावी. इतक्या सद- लत असतां ह्या नष्टाचाराचें पुनरुज्जीवन करण्याचे कोणाच्या मनांत येऊं नये ही आश्चर्याची गोष्ट आहे. ह्या धर्माचरणांत स्त्रियांची उन्नति आहे म्हणून त्यांनी ही गोष्ट मनावर घ्यावी. द्रव्याच्या अभावी दानधर्मा पुण्य मिळणे शक्य नाहीं; निरामयतेच्या अभावी व्रतादिकांचे आचरणहि हातून घडत नाहीं; ह्यास्तव अभिसेवेचा उपक्रम सर्व द्विजांनी करावा. पण विशेषतः स्त्रियांनी ह्याचा विचार करावा. मूर्तिपूजेपेक्षां अभिपूजा बरी.

१७